WPL 2023 | दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकला, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

| Updated on: Mar 26, 2023 | 7:42 PM

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात वूमन्स प्रीमिअर लीगमधील अंतिम सामना पार पडणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकला आहे.

WPL 2023 | दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकला, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
Follow us on

मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहे. दिल्ली कॅपिट्ल्स वूमन्सने या निर्णायक सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सला विजयी आव्हानाचं पाठलाग करावा लागणार आहे. या महामुकाबल्यासाठी दोन्ही संघांनी कसून सराव केला आहे. दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

अशी आहे दोन्ही संघांची कामगिरी

उभयसंघांनी या मोसमात 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. मात्र दिल्लीने नेट रनरेटच्या आधारावर अव्वल स्थान पटकावलं. साखळी फेरीत दोन्ही संघ एकूण 2 वेळा आमनेसामने आले. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामन्यात बाजी मारली. त्यामुळे दोन्ही संघ हे तोडीस तोड आहेत.

रोहित शर्माकडून वूमन्स मुंबई इंडियन्सला शुभेच्छा

दरम्यान या महामुकाबल्यासाठी मेन्स मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने मुंबईच्या पोरींना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या ट्विटरवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आलाय.

“तुम्ही सर्व ज्या प्रकारे गेल्या 4 आठवड्यांमध्ये खेळला ते पाहून आनंद झाला. आजचा सामन्यासारखा सामना हा तुम्हाला रोज रोज खेळण्याची संधी मिळणार नाही. फायनलचा आनंद घ्या आणि सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रय्तन करा. आम्हालाही तुम्हाला मैदानावर पाहून आनंद होणार आहे” अशा शब्दात रोहितने वूमन्स मुंबई इंडियन्सला शुभेच्छा दिल्या.

दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकला

 

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन| हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), मिन्नू मणी, राधा यादव आणि शिखा पांडे.