WPL 2024 : तिसरा कोण? युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चुरस, कसं गणित ते वाचा

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चुरस आता रंगतदार वळणार आली आहे. युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यापैकी कोणाला तिकीट मिळतं याची उत्सुकता वाढली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघ पात्र ठरले असून तिसऱ्या संघात जर तरच गणित आहे.

WPL 2024 : तिसरा कोण? युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चुरस, कसं गणित ते वाचा
WPL 2024 : युपी वॉरियर्स की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु! कोणाला मिळणार टॉप 3 मध्ये संधी?
| Updated on: Mar 11, 2024 | 11:04 AM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांनी टॉप 3 मध्ये एन्ट्री मारली आहे. पण तिसऱ्या संघासाठी युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. या दोन्ही संघांचा स्पर्धेतील शेवटचा सामना उरला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचं एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे यापैकी कोण टॉप ३ मध्ये एन्ट्री मारतो यांची उत्सुकता आहे. गुजराज जायंट्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात आज सामना होत आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना गुजरातने जिंकला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रवास सोपा होईल. नाही तर कठीण आव्हानाला सामोरं जावं लागू शकतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. बंगळुरुने 7 सामन्यात 3 विजय आणि 4 पराभवांसह एकूण 6 गुण मिळवले आहेत. अशीच यूपी वॉरियर्सचेही असून 6 गुण आहेत. पण या गणितात गुजरातला संधी चालून आली आहे. कारण स्पर्धेत त्यांचे दोन सामने बाकी आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु +0.027 च्या निव्वळ धावगतीमुळे तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या यूपी वॉरियर्सचा धावगती -0.365 आहे. दोन्ही संघांचा येथे आणखी एक सामना आहे आणि त्यावर त्यांचं पुढचं गणित अवलंबून आहे.

तिन्ही संघांचं प्लेऑफचं गणित

  • यूपी वॉरियर्स गुजरात जायंट्सविरुद्धचा पुढील सामना गमावला तर आरसीबीचा प्लेऑफचा मार्ग आणखी सोपा होईल. पण या गणितात गुजरातला जर तरची संधी मिळेल. गुजरातचा रनरेट पाहता तशी शक्यता कमीच आहे. पण दोन सामने असल्याने काहीही होऊ शकतं.
  • बंगळुरुचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. जर आरसीबीने हा सामना जिंकला तर ते 8 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित करू शकतात. कारण रनरेट चांगला आहे.
  • युपी वॉरियर्सने गुजरात विरुद्धचा सामना जिंकला तर आरसीबीला मुंबई इंडियन्सला मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल. तरच 8 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात.
  • यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्यावर आरसीबीचं भवितव्य अवलंबून आहे. या निकालानंतर आरसीबीला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेल्या रनरेटची स्पष्ट गणना कळेल.

….तर आरसीबी टॉप ३ मध्ये पोहोचेल

  • आरसीबीला मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे.
  • गुजरात जायंट्सने यूपी वॉरियर्सविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे.
  • दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us