
रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुने वूमन्स प्रीमिअर लीग 2025 या हंगामातील चौथ्या सामन्यात बंगळुरुने दिल्ली कॅपिट्ल्सवर 8 विकेट्सने धामकेदार विजय मिळवला आहे. बंगळुरुने सलग दुसरा विजय मिळवत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. दिल्लीने बंगळुरुला विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं होतं. बंगळुरुने हे आव्हान सहज पूर्ण केलं. बंगळुरुने हे आव्हान 22 बॉलआधी पूर्ण केलं. बंगळुरुने 16.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 146 धावा केल्या. कर्णधार स्मृती मनधाना ही बंगळुरुच्या विजयाची नायिका ठरली. स्मृतीने 81 धावांची खेळी केली. तर डॅनियल व्याट-हॉज हीने 42 धावा करत स्मृतीला अप्रतिम साथ दिली.
स्मृती आणि डॅनियल या सलामी जोडीने 107 धावांची सलामी भागीदारी केली. या भागीदारीने बंगळुरुच्या सलग दुसऱ्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर डॅनियल 42 धावा करुन आऊट झाली. मात्र डॅनियलने तिची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर एलिस पेरी मैदानात आली. स्मृतीला बंगळुरुला विजयी करुन नाबाद परतण्याची संधी होती. मात्र स्मृती फटकेबाजीच्या प्रयत्नात आऊट झाली. स्मृतीने 47 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 10 फोरसह 81 रन्स केल्या. त्यानंतर एलिस पेरी आणि रिचा घोष या जोडीने मुंबईला विजयापर्यंत पोहचवलं.
एलिस पेरी हीने 13 बॉलमध्ये नॉट आऊट 7 रन्स केल्या. तर रिचाने 5 चेंडूत 1 सिक्स आणि 1 फोरसह 11 धावा केल्या. दिल्लीसाठी शिखा पांडे आणि अरुंधती रेड्डी या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
दरम्यान बंगळुरुने या विजयासह मुंबईच्या विक्रमाची बरोबरी केलीय. बंगळुरुचा डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील सलग पाचवा विजय ठरला. बंगळुरुने यासह मुंबईच्या विक्रमाची बरोबरही केली.
बंगळुरुचा 2025 मधील सलग दुसरा विजय
Efficient 🤝 Effective
Purple Cap holder Renuka Singh Thakur wins the Player of the Match award for her clinical spell 👌👌
Scorecard ▶ https://t.co/CmnAWvkMnF#TATAWPL | #DCvRCB | @RCBTweets pic.twitter.com/kU0n5k1Imw
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 17, 2025
दिल्ली कॅपिटल्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : मेग लॅनिंग (कॅप्टन), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, मारिजान कॅप, सारा ब्राइस (विकेटकीपर), शिखा पांडे, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि मिन्नू मणी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना (कॅप्टन), डॅनियल व्याट-हॉज, एलिस पेरी, रघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, एकता बिश्त, जोशिता व्हीजे आणि रेणुका ठाकूर सिंग.