AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2026: अनुष्का शर्माने ठोकले 7 चौकार, पहिल्या सामन्यात 30 चेंडूत ठोकल्या इतक्या धावा

WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सने विजयाची पताका रोवली. या सामन्यात गुजरात जायंट्सकडून अनुष्का शर्माने उत्तम कामगिरी केली. पदार्पणाच्या सामन्यातच अनुष्का शर्माने गोलंदाजांना जेरीस आणलं.

WPL 2026: अनुष्का शर्माने ठोकले 7 चौकार, पहिल्या सामन्यात 30 चेंडूत ठोकल्या इतक्या धावा
WPL 2026: अनुष्का शर्माने ठोकले 7 चौकार, पहिल्या सामन्यात 30 चेंडूत ठोकल्या इतक्या धावाImage Credit source: PTI
| Updated on: Jan 10, 2026 | 7:16 PM
Share

Anushka Sharma In WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर आता पुढे जात आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात पार पडला. हा सामना गुजरात जायंट्सने 10 धावांनी जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल युपी वॉरियर्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात जायंट्सने या सामन्यात आक्रमक सुरुवात केली. बेथ मूनी आणि सोफी डिवाइन यांनी चांगली आणि आक्रमक फलंदाजी केली. ही जोडी फुटल्यानंतर अनुष्का शर्मा मैदानात उतरली. तिने आक्रमक लय कायम ठेवली आणि पदार्पणाच्या सामन्यात फटकेबाजी सुरू केली. अनुष्का शर्माने 30 चेंडूंचा सामना केला आणि 44 धावा ठोकल्या. यावेळी तिने 146.66 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. या खेळीत एकूण 7 चौकार मारले. तिने तिसर्‍या विकेटसाठी एश गार्डनरसह 103 धावांची भागीदारी केली.

22 वर्षीय अनुष्का शर्मा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघाकडून खेळते. अष्टपैलू खेळाडू असून अंडर 19 क्रिकेटमध्ये तिने नावलौकिक मिळवला होता. फलंदाज अनुष्का शर्मा मधल्या फळीत फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी देखील करते.त्यामुळे अनुष्का शर्माला घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स यांच्यात स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर गुजरात जायंट्सने मोठी बोली लावली आणि अनुष्काला संघात घेतलं. अनुष्का शर्मासाठी गुजरात जायंट्सने 45 लाखांची बोली लावली. बेस प्राईसच्या 4.5 पट जास्त पैसे मिळाले. लिलावात सर्वाधिक बोली लागलेली अनकॅप्ड खेळाडू ठरली. आता अनुष्का शर्मा आपल्या आक्रमक खेळीने हा निर्णय योग्यच होता हे दाखवून दिलं आहे. अनुष्का शर्माच्या खेळीमुळे संघाला 207 धावांपर्यंत मजल मारता आली.

अनुष्का शर्मा या पर्वात वरिष्ठ महिला संघाकडून टी20 स्पर्धेत खेळली. यावेळी तिने 207 धावा केल्या होत्या. आता वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. अनुष्का शर्माने वरिष्ठ महिला इंटरझोनल ट्रॉफीत सेंट्रल झोनसाठी चांगली कामगिरी केली होती. त्यात त्याने 125च्या स्ट्राईक रेटने 155 धावा केल्या होत्या. तसेच 7 विकेट घेतल्या होत्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...