Wtc Final 2023 | किती चेस करु शकाल? गांगुलीचा प्रश्न आणि रहाणेचं उत्तर, अजिंक्य म्हणाला..

| Updated on: Jun 10, 2023 | 12:27 AM

Ajinkya Rahane and Sourav Ganguly | तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अजिंक्य रहाणे याने सौरव गांगुली आणि जतिन सप्रू यांच्याशी संवाद साधला. या दरम्यान रहाणेने गांगुलीच्या प्रश्नाला मन जिंकणारं उत्तर दिलं.

Wtc Final 2023 | किती चेस करु शकाल? गांगुलीचा प्रश्न आणि रहाणेचं उत्तर, अजिंक्य म्हणाला..
Follow us on

लंडन | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यात चांदीच्या गदेसाठी लढाई सुरु आहे. टीम इंडियाला पहिल्या डावात 296 धावांवर ऑलआऊट केल्यानं ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात एकूण 173 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 44 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 123 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण 296 धावांची आघाडी आहे.

त्याआधी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 469 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 296 धावांवर रोखलं. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुर या दोघांच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारताला 295 पेक्षा अधिक धावा करता आल्या. रहाणे आणि शार्दुलने टीम इंडियाला सावरलं. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली.

हे सुद्धा वाचा

तसेच रहाणेने 17 महिन्यानंतर कमबॅक करताना 89 धावांची झुंजार खेळी केली. तर शार्दुल ठाकुर याने ओव्हलमध्ये अर्धशतकांची हॅटट्रिक केली. शार्दुल आणि अजिंक्य या दोघांनी टीम इंडियाची लाज राखली. या दोघांमुळे ऑस्ट्रेलियाला आणखी मोठी आघाडी घेता आली नाही.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 विकेट्स गमावून 123 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने यासह आता 296 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला जिंकण्साठी आता चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला झटपट ऑलआऊट करण्याचं आव्हान असणार आहे. कारण चौथ्या डावात भारतासमोर 300 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करण्याचं आव्हान असणार आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यांनतर रहाणेसोबत संवाद साधला. या दरम्यान जतीन सप्रू ही देखील तिथे होता. या दरम्यान दोघांनी रहाणेला अनेक प्रश्न विचारले. तसेच गांगुलीने रहाणेला “किती चेज करु शकाल?”, असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर रहाणेने मन जिंकणारं उत्तर दिलं. रहाणेच्या या उत्तराने त्याच्या आत्मविश्वासाचं दर्शन झालं. “ऑस्ट्रेलिया देईल तेवढं”, अशा 3 शब्दातच रहाणेने गांगुलीच्या किती चेज करु शकाल या प्रश्नाला उत्तर देत मनं जिंकली.

सौरव गांगुलीचा प्रश्न अजिंक्य रहाणेचं उत्तर

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.