AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू माझ्यापेक्षा जास्त कमावते..! पत्नी एलिसा हीलीने मुलाखत घेत असताना मिचेल स्टार्क असं का म्हणाला?

Alyssa Healy interviews Mitchell Starc: ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी धडाधड विकेट पडल्या. या सामन्यात लंच ब्रेकमध्ये मिचेल स्टार्कची पत्नी एलिसा हीलीने त्याची मुलाखत घेतली.

तू माझ्यापेक्षा जास्त कमावते..! पत्नी एलिसा हीलीने मुलाखत घेत असताना मिचेल स्टार्क असं का म्हणाला?
तू माझ्यापेक्षा जास्त कमावते..! पत्नी एलिसा हीलीने मुलाखत घेत असताना मिचेल स्टार्क असं का म्हणाला?Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Aug 22, 2026 | 6:04 PM
Share

ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू असून पहिल्या दिवसावर कांगारूंनी मजबूत पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने आपल्या भेदक गोलंदाजीने बांग्लादेश संघाची दाणादाण उडवून दिली. फक्त 22 चेंडूत 5 विकेट काढल्या आणि बांग्लादेश संघाची टॉप ऑर्डर तंबूत पाठवली. त्यामुळे मिचेल स्टार्कची दहशत बांगलादेशी फलंदाजांमध्ये होती. असं असताना या स्पेलनंतर लंच ब्रेक झाला आणि एक मजेशीर क्षण क्रीडाप्रेमींना अनुभवता आला. ऑस्ट्रेलियन महिला संघाची माजी कर्णधार एलिसा हीली हिने पती मिचेल स्टार्कची मैदानावरच मुलाखत घेतली. यावेळी दोघांची थट्टा मस्करी पाहायला मिळाली. मजेशीर प्रश्न आणि उत्तरांचा तास रंगला होता. त्यामुळे ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत राहिली आहे.

रात्रीच्या जेवणाचं बिल आणि पगारावरून मजेशीर वार्तालाप

एलिसा हीलीने विचारलं की, सर्वप्रथम तुझं अभिनंदन. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि दोन्ही संघांकडून तुम्हाला हीच अपेक्षा होती का? मिचेल स्टार्कने उत्तर दिलं की, ‘तु्म्ही हे आधीही सांगितलं होतं. तुम्ही आमच्यातील बहुतांश खेळाडूंच्या तुलनेत अधिक खेळल्या आहेत. मागच्या आठवड्यात डार्विनमध्ये आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नव्हतो. पण या खेळपट्टीवर पहिल्यांदा गोलंदाजी करून फायदा घेणं गरजेचं होतं. क्वींसलँडच्या सहकारी खेळाडूंचं म्हणणं होतं की, ही खेळपट्टी गाबासारखी उसळी आणि गती देत आहे. पहिल्या सत्रात सहा विकेट काढणं जबरदस्त होतं. यासारख्या आनंदाची बाब नाही.’ बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 34 षटकं खेळला आणि 64 धावांवर सर्वबाद झाला. मिचेल स्टार्कने या सामन्यात 6 विकेट काढल्या. तर पॅट कमिन्सने 3 आणि जोश हेझलवूडने एक विकेट काढली.

View this post on Instagram

A post shared by Fox Cricket (@foxcricket)

एलिसा हीली म्हणाली की, या सामन्याचं चित्र असं असेल असा कोणी विचार केला नसेल? काल रात्री जेवणाचे पैसे मी भरले होते. तर आज रात्री तू पैसे भरणार असा अर्थ काढायचा का? त्यावर मिचेल स्टार्कने मिश्किलपणे उत्तर देताना हसला आणि सांगितलं की, तू माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवते. हो की नाही? दोन्ही क्रिकेटपटूंची ही मुलाखत सध्या चर्चेचा विषय आहे. त्यांच्या मुलाखतीचा व्हीडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमवून 165 धावा केल्या आहे. ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावात 101 धावांची आघाडी आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक