AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : 4 वर्षांत तिसरा दौरा, टीम इंडिया 3 सामने खेळणार, टी 20i मालिकेचं वेळापत्रक जाहीर

India Tour Of Zimbabwe 2026 : टीम इंडिया यजमान झिंबाब्वे विरुद्ध जुलै महिन्यात 4 दिवसांत 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. हे तिन्ही सामने एकाच मैदानात होणार असल्याने दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

Cricket : 4 वर्षांत तिसरा दौरा, टीम इंडिया 3 सामने खेळणार, टी 20i मालिकेचं वेळापत्रक जाहीर
Indian Cricket TeamImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 01, 2026 | 4:27 PM
Share

सध्या भारतात आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाचा ‘रन’संग्राम पाहायला मिळत आहे. अपवाद वगळता क्रिकेट वर्तुळातील बहुतांश खेळाडू या लीग स्पर्धेत खेळत आहेत. एकूण 10 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी ही चुरस पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने अवघ्या काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या मायदेशातील काही मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार झिंबाब्वे क्रिकेट टीम 2002 नंतर 2027 साली भारत दौरा करणार असल्याचं निश्चित झालं. त्यानुसार टीम इंडिया मायदेशात झिंबाब्वे विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी अपडेट समोर आली आहे.

भारताचा झिंबाब्वे दौरा 2026

टीम इंडिया 2026 वर्षात झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती देत वेळापत्रक जाहीर केलं आहे. उभयसंघातील ही मालिका जुलै महिन्यात होणार आहे. एकूण 4 दिवसांत 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानुसार 23 ते 26 जुलै दरम्यान ही मालिका पार पडणार आहे. एकाच मैदानात हे तिन्ही सामने होणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार राजधानी हरारे इथे हे सामने होणार आहेत.

सूर्यकमार यादव कॅप्टन

सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा नियमित टी 20i कर्णधार आहे. त्यामुळे या मालिकेतही सूर्याच नेतृत्व करेल, हे क्रिकेट चाहत्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही.

टीम इंडियाला सुट्टी नाहीच!

टीम इंडियाचे खेळाडू टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता आयपीएल 2026 मध्ये बिजी आहेत. त्यानंतर टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध मायदेशात भिडणार आहे. इंग्लंड, आयर्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियाच्या झिंबाब्वे दौऱ्याची सुरुवात होईल.

भारताचा 4 वर्षांत तिसरा दौरा

दरम्यान टीम इंडियाचा 4 वर्षात हा तिसरा दौरा असणार आहे. टीम इंडियाने याआधी 2024 आणि 2022 साली झिंबाब्वे दौरा केला होता.

झिंबाब्वे-भारत टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 23 जुलै, हरारे

दुसरा सामना, 25 जुलै, हरारे

तिसरा सामना, 26 जुलै, हरारे

सूर्यासेनेचा झिंबाब्वे दौरा 2026

टीम इंडिया-झिंबाब्वे हेड टु हेड रेकॉर्ड

दरम्यान टी 20I क्रिकेटच्या इतिहासातील आकडेवारी पाहता टीम इंडिया झिंबाब्वेवर वरचढ असल्याचं सिद्ध होतं आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात एकूण 14 टी 20I सामने खेळवण्यात आले आहे. भारताने त्यापैकी 11 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर झिंबाब्वेने भारतावर 3 सामन्यांमध्ये विजय साकारला आहे. टीम इंडियाने नुकत्याच झालेल्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत झिंबाब्वेला पराभूत केलं होतं.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा