सचिन तेंडुलकर सोबत पाकिस्तान दौऱ्यात डेब्यू करणारा क्रिकेटर या आजाराने त्रस्त, CID मालिकेत केलय काम

कराची कसोटीच्या दोन्ही डावात त्याने प्रत्येकी एक-एक विकेट काढला. जानेवारी 2023 ते ऑगस्ट 2024 दरम्यान तो भारतीय टीमचा नॅशनल सिलेक्टर होता. त्याआधी 2021 ते 2023 पर्यंत तो मुंबई क्रिकेट टीमचा चीफ सिलेक्टर होता.

सचिन तेंडुलकर सोबत पाकिस्तान दौऱ्यात डेब्यू करणारा क्रिकेटर या आजाराने त्रस्त, CID मालिकेत केलय काम
Sachin Tendulkar
| Updated on: May 07, 2026 | 11:36 AM

प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने 1989 साली पाकिस्तानी दौऱ्यात कराची कसोटीमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. त्याचवेळी भारताच्या अजून एका क्रिकेटपटूने सचिन तेंडुलकरसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता. त्याचं नाव आहे सलिल अंकोला. सध्या सलिल अंकोला 58 वर्षांचा असून तो डिप्रेशनचा सामना करतोय. पुण्याजवळच्या एका मानसिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सलिल अंकोलाने सचिन तेंडुलकरसोबतच गुजरांवला येथे वनडे क्रिकेटमध्ये डेब्यु केलेला. ऑक्टोबर 2024 मध्ये आईचं निधन झाल्यानंतर सलिल मानसिक दृष्टया खूप त्रस्त होता. त्याला त्या दु:खातून बाहेर पडता येत नव्हतं. तो सतत आजारी पडायचा. त्यानंतर त्याने स्वत: उपचार करण्याचा निर्णय घेतला असं सलिल अंकोलाची पत्नी रिया अंकोलाने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं.

सलिलने वेळेतच ब्रेक घेऊन स्वत:ला संभाळण्याचा निर्णय घेतला याचं आम्हाला समाधान आहे असं रियाने सांगितलं. सलिलच्या प्रकृतीत आता वेगाने सुधारणा होतेय. नियमितपणे तो वर्कआऊट सुद्धा करतो असं तिने सांगितलं. “क्रिकेट नेहमीच त्याचं पहिलं प्रेम आहे. तो फायटर वृत्तीचा आहे. प्रत्येकवेळी कठीण काळात तो मजबूत होऊन बाहेर पडलाय. क्रिकेट विश्वाने सुद्धा नेहमीच सलिलच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन केल आहे” असं रिया अंकोला म्हणाली.

नॅशनल सिलेक्टर होता

जवळपास दोन दशकापूर्वी सलिल अंकोला दारुच्या आहारी गेला होता. रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार झाले. यावेळी त्याच्या मानसिक स्थितीचा दारुशी काही संबंध नाहीय हे तिने स्पष्ट केलं. कारण त्याने खूप आधीच दारु सोडून दिलीय. जानेवारी 2023 ते ऑगस्ट 2024 दरम्यान सलिल अंकोला भारतीय टीमचा नॅशनल सिलेक्टर होता. त्याआधी 2021 ते 2023 पर्यंत तो मुंबई क्रिकेट टीमचा चीफ सिलेक्टर होता.

क्रिकेटमध्ये कामगिरी कशी?

भारतासाठी 20 वनडे सामने खेळताना अंकोलाने 13 विकेट काढल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा शानदार रेकॉर्ड आहे. त्याने 54 फर्स्ट क्लास सामन्यात 181 विकेट आणि 75 लिस्ट A च्या सामन्यात 70 विकेट काढले. कराची कसोटीच्या दोन्ही डावात त्याने प्रत्येकी एक-एक विकेट काढला. त्यानंतर त्याला पुन्हा कसोटीमध्ये संधी मिळाली नाही.

त्याने CID मध्ये काम केलं

क्रिकेटनंतर सलिल अंकोलाने मनोरंजन विश्वात ओळख बनवण्याचा प्रयत्न केला. त्याने CID मध्ये काम केलं. अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये तो दिसला. आता डिप्रेशनवर तो मात करुन पुन्हा पूर्वीसारखा फिट होऊन आपल्यासमोर येईल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

 

Follow Us