टीम इंडियाच्या पराभवानंतर दिनेश कार्तिकने टाळी वाजवली, मग रोहित शर्माने…

टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर काल खेळाडू नाराज दिसत होते.

टीम इंडियाच्या पराभवानंतर दिनेश कार्तिकने टाळी वाजवली, मग रोहित शर्माने...
ROHIT SHARMA
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 05, 2022 | 3:02 PM

कालच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला, त्यानंतर टीममधील अनेक खेळाडूंच्या (Player) चेहऱ्यावर निराशा पाहायला मिळाली. कालच्या समान्यात दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) तुफान फलंदाजी केली. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. कार्तिक कालच्या सामन्यात चुकीचा शॉट मारत असताना बाद झाला. त्याची खेळी पाहून असं वाटतं होतं की, त्याच्याकडून आज मोठी खेळी होणार आहे.

आफ्रिकेच्या फलंदाजांनी कालच्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली. त्यामुळे आफ्रिकेची धावसंख्या 200 च्या वरती गेली. दुसऱ्यांदा फलंदाजी करीत असताना दिनेश कार्तिक शिवाय एकाही फलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही.

टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर काल खेळाडू नाराज दिसत होते. कालपासून गोलंदाजांवरती जोरदार टीका सुरु आहे. कारण आशिया चषकापासून गोलंदाजांची कामगिरी खराब सुरु झाली आहे. कालच्या सामन्यात गोलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली.

ज्यावेळी रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक मैदानात आले, त्यावेळी दोघांची मस्ती तिथं पाहायला मिळाली. ज्यावेळी रोहित कार्तिकला चुकीच्या पद्धतीने कसा बाद झाला हे सांगतं होता.