मित्राचं मुल बायकोच्या पोटात, पत्नीबद्दल समजातच…वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेला भारतीय क्रिकेटर
भारतीय क्रिकेटपटूला त्याच्या मित्राने धोका दिला होता, त्याच्या मित्राने आणि त्याच्या बायकोने त्याला फसवले. यानंतर तो स्वत:ला सावरु शकला नव्हता.

टीम इंडियाच्या दोन स्टार क्रिकेटपटूंमध्ये असेच काहीसे घडले, जे एकेकाळी खूप जवळचे मित्र होते. ते अनेक वर्षे एकत्र देशांतर्गत क्रिकेट खेळले. या काळात त्यांची मैत्री खूप खास झाली. पण नंतर एका मुलीमुळे त्यांच्या आयुष्यात वादळ आले. भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांच्यात असंच घडलं.
२००७ ला जेव्हा २१ वर्षीय दिनेश कार्तिकने आपली बालपणीची मैत्रीण निकिता वंजाराला आपली जीवनसाथी म्हणून निवडले. निकिताचे वडील आणि दिनेशचे वडील हे देखील खूप चांगले मित्र होते. निकिता आणि दिनेश एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते आणि एकत्र मोठे झाले होते. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली आणि दिनेश व निकिताने मुंबईत विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
२०१२ मध्ये, तामिळनाडू कर्नाटकविरुद्ध विजय हजारे ट्रॉफी सामना खेळत होता. या सामन्यादरम्यान, दिनेश कार्तिकला त्याची पत्नी निकिता आणि त्याचा मित्र मुरली विजय यांच्यातील प्रेमसंबंधांबद्दल समजले. विजय आणि निकिता यांच्यातील प्रेमसंबंधांबद्दल कळल्यानंतर दिनेश कार्तिक पूर्णपणे खचून गेला आणि त्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
२०१२ मध्ये दिनेश कार्तिकला घटस्फोट दिल्यानंतर, त्याच वर्षी निकिता आणि मुरली विजय यांनी लग्न केले. विजय आणि निकिताच्या मुलाचा जन्म २०१३ मध्ये झाला. अनेक वृत्तांनुसार, दिनेशला घटस्फोट देताना निकिता गर्भवती होती आणि ते बाळ मुरली विजयचे होते. २०१४ आणि २०१७ मध्ये निकिता आणि मुरली पुन्हा पालक झाले.
या घटनेनंतर, मुरली विजय आणि दिनेश कार्तिक कधीही एकत्र खेळले नाहीत. २०१८ मध्ये, टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांची एकत्र निवड झाली. हा त्या दोघांसाठी खूप अवघड क्षण होता. असे म्हटले जाते की या दौऱ्यादरम्यान त्यांनी एकमेकांशी संवाद साधला नाही. ”
यानंतर दिनेश कार्तिकसोबतच्या काही भेटींनंतर दीपिका त्याच्या प्रेमात पडली. दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये लग्न केले. आता दीपिका आणि दिनेशला तीन मुले आहेत. दोन जुळे मुले आणि एक मुलगी आहे.