PAK vs ENG : इंग्लंडकडून पाकिस्तान टीम पराभूत, पाकिस्तान चाहत्यांची पुन्हा निराशा

पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर चाहते एकदम निराश झाले होते. रात्रीपासून सोशल मीडियावर जोरदार टीका सुरु आहे.

PAK vs ENG : इंग्लंडकडून पाकिस्तान टीम पराभूत, पाकिस्तान चाहत्यांची पुन्हा निराशा
PAK vs ENG
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 21, 2022 | 7:41 AM

आशिया चषकात (Asia Cup 2022) अंतिम मॅच विरुद्ध पाकिस्तानचा (Pakistan Team) संघ पराभूत झाल्यानंतर चाहत्यांनी खेळाडूंवर जोरदार टीका केली होती. कारण श्रीलंकेच्या (Shrilanka) खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन करीत विजय मिळविला होता. आशिया चषकात सगळ्या सामन्यात खेळाडूंचा संघर्ष पाहायला मिळाला होता. काल पाकिस्तानच्या मैदानावर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात एक मॅच झाली. इंग्लंडच्या खेळाडूंनी ती सहज जिंकल्याने पुन्हा खेळाडूंवरती टीका व्हायला सुरुवात झाली आहे.

कालच्या सामन्यात विशेष म्हणजे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंनी एक अनोखी जर्मी परिधान केली होती. तसेच कालच्या सामन्यातील रक्कम ही निधीच्या स्वरुपात पाकिस्तानच्या खेळाडूंना देण्यात येणार आहे.

त्यामुळे सगळ्या खेळाडूंनी काल सामना पाहायला या असं आवाहन विविध माध्यमातून केलं होतं. कालचं मैदान सुद्धा भरगच्च दिसत होतं.

पाकिस्तानच्या मैदानावर काल इंग्लंड टीम टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानची टीमला 158 धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडच्या टीमने हे टार्गेट सहज पुर्ण केलं.

पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर चाहते एकदम निराश झाले होते. रात्रीपासून सोशल मीडियावर जोरदार टीका सुरु आहे.