T20 World Cup: पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी इंग्लंडचा टीमचा मास्टर प्लॅन तयार

सोशल मीडियावर क्रिकेटच्या चाहत्यांनी आतापासून तर्क लावायला सुरुवात केली आहे.

T20 World Cup: पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी इंग्लंडचा टीमचा मास्टर प्लॅन तयार
PAK vs ENG
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 12, 2022 | 8:16 AM

मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) पाकिस्तानला (PAK) पराभूत करण्यासाठी इंग्लंडने (ENG) एक प्लॅन केला आहे. उद्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे. त्यासाठी दोन्ही टीम कसून सराव करीत आहे. त्याचबरोबर मैदानातील प्लॅन दोन्ही टीमनी तयार केले आहेत. टीम इंडियाचा पराभव करुन इंग्लंड टीम फायनलमध्ये पोहोचली. तर पाकिस्तान टीम न्यूझिलंड टीमचा पराभव फायनलमध्ये पोहोचली आहे.

सोशल मीडियावर क्रिकेटच्या चाहत्यांनी आतापासून तर्क लावायला सुरुवात केली आहे. कारण उद्या दोन्ही टीमचा महामुकाबला चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. इंग्लंडची टीम पाकिस्तान टीमपेक्षा सरस असल्याची सोशल मीडियावर चाहत्यांची चर्चा आहे.

मैथ्यू मॉट हे इंग्लंड टीमचे प्रशिक्षक आहेत. दोन महत्त्वाचे खेळाडू जखमी झाले आहेत. तरी सुध्दा टीम इंडियाच्याविरुद्ध गोलंदाजांनी सेमीफायनलच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली असं कोचने जाहीर केले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचे जखमी खेळाडू वुड आणि डेविड मलान या दोन खेळाडूंचा फायनलसाठी विचार करण्यात येणार आहे.

जखमी झालेल्या दोन गोलंदाजांना टीम इंग्लंड खेळवण्याची शक्यता आहे. कारण वुड आणि डेविड मलान या दोन खेळाडूंनी आतापर्यंत चांगली खेळी केली आहे. त्याचबरोबर वुड या गोलंदाजांने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भेदक गोलंदाजी केली आहे. कारण त्याने 4 मॅचमध्ये त्याने 9 विकेट घेतल्या आहेत

संपुर्ण जगाचं लक्ष लागलेली मॅच उद्या होणार आहे. दोन्ही टीमला क्रिकेटच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सल्ला दिला आहे. तर काही माजी दिग्गज खेळाडूंनी सुद्धा दोन्ही टीमला सोशल मीडीयाच्या माध्यमातून सल्ला दिला आहे.