AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs Eng, T20 World Cup Semi Final : तीच चूक नडली ! भारताविरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार, इंग्लंडच्या कॅप्टनने कोणावर फोडलं खापर ?

सेमीफायनलमध्ये भारताच्या 254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, बेथेलच्या शतकानंतरही इंग्लंडला फक्त 246 धावा करता आल्या. 7 धावांनी पराभव झाल्याने इंग्लंडच्या फायनलच्या आश धुळीस मिळाल्या आणि त्यांना बाहेर पडावं लागलं. हा पराभव कोणामुळे झाला, इंग्लंडच्या कॅप्टनचा कोणाकडे होता रोख ?

IND vs Eng, T20 World Cup Semi Final : तीच चूक नडली ! भारताविरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार, इंग्लंडच्या कॅप्टनने कोणावर फोडलं खापर ?
हॅरी ब्रूक Image Credit source: Matt Roberts-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Mar 06, 2026 | 9:47 AM
Share

आयसीसी टी20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup ) काल झालेला सेमीफायनलचा सामना इंग्लंडला बराच काळ झोपू देणार नाही. भारताने दिलेल्या 254 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा हातातोंडाशी आलेला विजय निसटला. अवघ्या 7 धावांनी तक्यांना पराभव पत्करावा लागला. 20 ओव्हरमध्ये इंग्लंडच्या संघाने 7 गडी गमावून 246 धावा केल्या. या पराभवामुळे फायनलमध्ये पोहोचून, वर्ल्डकप उचलण्याचं इंग्लंडचं स्वप्न धुळीस मिळालं आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर पडाव लागलं. कालच्या विजयासह भारताने फायनलमध्ये धडक मारली असून आता 8 मार्च रोजी त्यांचा सामना न्युझीलंडशी होणार आहे. हा सामना जिंकून वर्लडकपची ट्रॉफी पुन्हा उटलण्यास भारतीय संघ उत्सुक असून, त्यांना रोखून न्युझीलंडचा नाव वर्ल्डकपवर कोरण्यास त्यांचा संघही कसून प्रयत्न करताना दिसेल. या सामन्याकडे प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या नजरा लागल्या आहेत.

सॅमसनची शानदार खेळी 

दरम्यान कालच्या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने संपूर्ण सामन्याचे विश्लेषण करत पराभवाची कारणंही सांगितलं. टीम इंडियाची बॅटिंग सुरू असताना संजू सॅमसनचा सोडलेला कॅच इंग्लंडला प्रचंड महागात पडल्याचे नमूद करत तीच मोठी चूक ठरल्याचं ब्रूकने कबूल केलं. एकदा जीवदान मिळाल्यानंतर संजू सॅमसनने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही आणि 89 धावांची शानदार खेळी करत भारताला मोठा स्कोअर करून देण्यात मोलाचा वाटा बजावला. विजयानंतर त्यालाच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

भारताची फलंदाजी सुरू असतानाच 15 धावांवर जीवदान मिळालेल्या संजू सॅमसनने याचा पुरेपूर फायदा उचलला आणि अवघ्या 42 चेंडूत 7 षटकार 8 आठ चौकारांसह 89 धावा फटकावल्या. आणि भारताला सात बाद 253 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली, जी स्पर्धेच्या इतिहासातील नॉकआउट सामन्यातीव सर्वोच्च धावसंख्या आहे. तर भारताच्या 254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, बेथेलच्या शतकानंतरही (105 धावा, 7 षटकार, 8 चौकार) इंग्लंडला सात गडी गमावून फक्त 246 धावाच करता आल्या आणि पराभव पत्करावा लागला.

तीच माझी मोठी चूक ठरली

“पहिल्या डावात चेंडू थांबेल आणि अधिक फिरेल असे आम्हाला वाटले होते, पण चेंडू बॅटवर चांगला आला आणि भारताने चांगली फलंदाजी केली,” असे ब्रुकने सामन्यानंतर नमूद केलं. “संजू सॅमसनचा कॅच सोडून मी खूप मोठी चूक केली हे मी मान्य करतो. आम्ही क्षेत्ररक्षणात फारशी चांगली कामगिरी केली नाही. आम्ही चुका केल्या आणि भारतासारख्या संघाविरुद्ध खेलताना या चुका परवड नाहीत ” असं म्हणत ब्रूकने चुकीची कबुली दिली.

मात्र ब्रूकने बेथेलचं खूप कौतुकही केलं. “बेथेलचा खेळ खरोखरच अविश्वसनीय होता, तो खूप पैसे कमवणार आहे. त्याने पहिल्या चेंडूपासूनच धावा केल्या आणि तो काय करण्यास सक्षम आहे, हे जगाला दाखवू दिलं. आमची स्पर्धा चांगली झाली आणि आम्ही कसे खेळलो याचा आम्हाला अभिमान असायला हवा. आम्ही संपूर्ण सामन्यात चिकाटीने खेळलो, परंतु दुर्दैवाने, निकाल आमच्या मनासारखा गेला नाही,” असं ब्रूकने नूद केलं.

Follow Us
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय