VIDEO : धक्कादायक, पाकिस्तानी क्रिकेट टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये अज्ज्ञात माणसाची घुसखोरी

Babar Azam: दक्षिण आफ्रिकेवर 93 धावांनी शानदार विजय मिळवून लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तानने बाबर आजमचा 31 वा वाढदिवस साजरा केला. बाबर आजम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचमध्ये काही खास करु शकला नाही.

VIDEO : धक्कादायक, पाकिस्तानी क्रिकेट टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये अज्ज्ञात माणसाची घुसखोरी
Pakistan Team
| Updated on: Oct 16, 2025 | 3:26 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC)2025-27 मध्ये पाकिस्तानने आपल्या अभियानाची शानदार सुरुवात केली आहे. लाहोर येथे पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरवून पॉइंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान मिळवलं. 15 ऑक्टोंबरला पाकिस्तानने मिळवलेला हा विजय खास ठरला. कारण या दिवशी टीमचा स्टार फलंदाज बाबर आजमचा वाढदिवस होता. संपूर्ण टीमने मिळून या स्टार खेळाडूला विजयाची भेट दिली. यावेळी एक अज्ज्ञात माणूस बाबर आजमला भेटण्यासाठी त्याच्या ड्रेसिंग रुमपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

दक्षिण आफ्रिकेवर 93 धावांनी शानदार विजय मिळवून लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तानने बाबर आजमचा 31 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी एक युवक सुरक्षा कडं भेदून बाबर आजमपर्यंत म्हणजे ड्रेसिंग रुमपर्यंत पोहोचेला. ही घटना 15 ऑक्टोंबरची मॅचच्या शेवटच्या दिवसाची आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, एक चाहता माजिद खान एनक्लोजर चढून ड्रेसिंग रुमजवळ पोहोचला. या दरम्यान कोचिंग स्टाफने सुरक्षा अधिकाऱ्यांना ही माहिती दिली.

घटनेच्यावेळी बाबर ड्रेसिंग रुममध्ये नव्हता

सुरक्षा अधिकाऱ्यांनी पळत जाऊन त्या युवकाला पाकिस्तानी टीमच्या ड्रेसिंग रुमपर्यंत पोहोचण्यापासून रोखलं. बाबरला भेटायचय असं तो युवक वारंवार सांगत होता. पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढलं. मैदानावर उपस्थित लोकांनी सांगितलं की, तो मुलगा खूप खुश होता. त्याला आपल्या आदर्शाला जन्मदिनाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने अजूनपर्यंत सुरक्षेतील या त्रुटीबद्दल अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाही. घटनेच्यावेळी बाबर ड्रेसिंग रुममध्ये नव्हता. पण नंतर टीम स्टाफने त्याला या घटनेची माहिती दिली.

 

 

बाबर आजमने शेवटचं शतक कधी झळकवलेलं?

बाबर आजम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचमध्ये काही खास करु शकला नाही. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 48 चेंडूत केवळ 23 धावा करुन तो बाद झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये बाबरने 72 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. बाबर आजम जवळपास मागच्या 74 इनिंगपासून एकही शतक झळकवू शकलेला नाही.