IND vs NZ 2nd Test : सिराजला त्या अवस्थेत पाहून माजी क्रिकेटपटू अस्वस्थ, तो रडतोय..
क्रिकेटर मोहम्मद सिराज धमाकेदार खेळाकरिता ओळखला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून तो संघर्ष करत आहे. आताही त्याला संघात स्थान मिळाले नाही. शुभमन गिल याने मोहम्मद सिराज याला दुसऱ्याही कसोटी सामान्यापासून दूर ठेवले.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सतत चर्चेत असलेले नाव आहे. मात्र, मोहम्मद सिराज याला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले. उत्तर कामगिरी करूनही संधी मिळाली नसल्याने सिराज नाराज असल्याची चर्चा आहे.
नाणेफेकीनंतर सिराज गॉगल लावून इकडे तिकडे बघताना दिसला. यावर माजी भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक याने काही प्रश्न उपस्थित केले. सिराज का रडतोय असा थेट सवालच करून टाकला. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे.
पहिला सामना वेलिंग्टन येथे खेळण्यात आला. त्या सामन्यात सिराजला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही.टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये सिराजचा समावेश आहे. तरीही त्याला पहिल्या कसोटीत संधी देण्यात आली नाही.
शुभमन गिललने पुन्हा एकदा सिराजला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. ज्याचा जागी गुरनू ब्रारला संधी देत कसोटीत पदार्पणाची संधी दिली. सहा वर्षामध्ये सिराजसोबत पहिल्यांदाच असे घडले. यादरम्यान नाणेफेकीनंतर सिराज गॉगल लावून फिरताना दिसला.
कार्तिक म्हणाला की, तो रडत आहे का? तो भावूक झाला. काही खेळाडू संघातून वगळल्यानं सहज निर्णय स्वीकारतात. पण काही खेळाडूंना कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळायचे असते.
कधीही दुखापत होवो त्यांना मैदानात उतरू न खेळायचे एसते. त्यांना कशाचीही पर्वा नसते. सिराज त्यापैकीच एक आहे. ऑगस्ट महिन्यात सिराजने शेवटचा कसोटी सामना खेळला, त्याला अपेक्षित यश यादरम्यान मिळाले नाही.