T20 World Cup 2022 : केएल राहूलला टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा सपोर्ट, म्हणाला त्याला माहित आहे की…

पाकिस्तान, नेदरलॅंड, आफ्रिका यांच्या विरुद्ध केएल राहूल याची चांगली खेळी झालेली नाही.

T20 World Cup 2022 : केएल राहूलला टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा सपोर्ट, म्हणाला त्याला माहित आहे की...
KL Rahul
Image Credit source: icc
| Updated on: Nov 01, 2022 | 1:09 PM

मेलबर्न : टीम इंडियाचा (Team India) धडाकेबाज फलंदाज केएल राहूलचा (KL Rahul) सध्या खराब फॉर्म सुरु आहे. विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) त्याला झालेल्या तीन मॅचमध्ये अधिक धावा करता आलेल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या फॉर्मविषयी अनेक दिग्गजांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याच्या जागी इतर खेळाडूंना संधी द्यावी अशी मागणी टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने केली आहे. पण टीम इंडियामधील दिग्गज खेळाडू आणि प्रशिक्षक त्याच्या पाठीशी ठाम उभे आहेत.

पाकिस्तान, नेदरलॅंड, आफ्रिका यांच्या विरुद्ध केएल राहूल याची चांगली खेळी झालेली नाही. त्यामुळे चाहत्यांनी राहूलला सोशल मीडियावर अधिक ट्रोल केले आहे. पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहूल द्रवि़ड राहूलच्या पाठीशी उभे असल्याचे समजते.

ज्यावेळी पत्रकार परिषद झाली, त्यावेळी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविडने आमचा राहूलला पुर्ण पाठिंबा आहे. हे त्याला सुद्धा माहित आहे. बांगलादेशविरुद्ध तो चांगली कामगिरी करेल अशी आम्हाला आशा आहे.

बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग