वनडे कॅप्टन्सीही गमावणार रोहित शर्मा ? गंभीरच्या त्या विधानाने खळबळ

टी-20 क्रिकेटनंतर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटलाही अलविदा म्हटल आहे. आता त्याच्याकडे फक्त एकदिवसीय संघाचे कर्णधारपद उरले आहे. पण गौतम गंभीरच्या ताज्या विधानानंतर, त्याच्या वनडे कर्णदारपदाबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत.

वनडे कॅप्टन्सीही गमावणार रोहित शर्मा ? गंभीरच्या त्या विधानाने खळबळ
गौतम गंभीरचं मोठं विधान चर्चेत
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: May 24, 2025 | 12:32 PM

रोहित शर्माने साधारण वर्षभरापूर्वी टी-20 क्रिकेट मधून संन्यास घेतला तर काही दिवसांपूर्वीच त्याने कसोटी क्रिकेटमधून देखील निवृत्ती घेतली. आता त्याच्याकडे फक्त भारताच्या एकदिवसीय संघाची कमान उरली आहे. पण आती तीही त्याच्या हातून निसटेल की काय अशी शक्यता व्यक्त होत आहे. टेस्ट क्रिकेटसाठी अजून तरी नवीन कर्णधाराची घोषणा झालेली नाही. मात्र टी-20 संघाचे नेतृ्त्व सध्या सूर्यकुमार यादवकडे आहे. पण रोहितच्या कसोटीतून निवृत्तीनंतर, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडे पूर्वीपेक्षा जास्त शक्ती असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माला कर्णधारपद सोडावे लागू शकते. गंभीरने त्याच्या ताज्या विधानातून अप्रत्यक्षरित्या एक संदेश दिला आहे.

कॅप्टन्सीबाबत गंभीरचं मोठं विधान

टीम इंडियाच्या कर्णधारपदाबद्दल गौतम गंभीर म्हणाला, “जर तुम्ही मला प्रशिक्षक म्हणून विचाराल, तर सर्व फॉरमॅटसाठी एकच कर्णधार असेल, एकाच व्यक्तीसोबत काम करणे चांगले असते. पण असे होत नाही. आजच्या काळात, तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की कोणालाही 12 महिने कर्णधार बनवता येत नाही. तुम्ही 10 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता आणि 2 महिने आयपीएल. अशा परिस्थितीत, टीम इंडियाचा कर्णधार असेल तोच फ्रँचायझीचे नेतृत्व ररतो. पण यामळे त्या खेळाडूच्या मनावर आणि खेळावर खूप वाईट परिणाम होईल. म्हणून दोन कर्णधार असणे चांगले आहे. यामुळे दबाव कमी होऊ शकतो.” असं विधान गंभीरने केलं आहे.

सर्व फॉरमॅटसाठी एकाच खेळाडूला कर्णधार बनवणे चांगले की आपल्याकडे वेगवेगळे संघ आणि तीन वेगवेगळे कर्णधार असावेत, असा सवाल एका मुलाखतीदरम्यान गंभीरला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्याने 3 ऐवजी 2 कर्णधार सुचवले. पण कसोटी संघाच्या कर्णधारपदाची घोषणा झाल्यानंतर, टीम इंडियाकडे वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये 3 कर्णधार असतील. जर गंभीर दुसऱ्या कर्णधाराला चांगला मानत असेल आणि या दिशेने काम करण्याचा विचार करत असेल तर याचा अर्थ असा होतो की रोहितला कर्णधारपद सोडावे लागू शकते. गंभीरच्या दबावामुळे रोहितला कसोटीतून निवृत्ती घ्यावी लागली असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. मात्र आताही तसचं होईल की नाही, हे येणारा काळच ठरवेल.

2027 वर्ल्डकप खेळणार रोहित-विराट ?

रोहित शर्मा आणि त्यापाठोपाठ विराट कोहली यांनी आधी टी-20 तर त्यानंतर कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटलं. पण ते दोघे अजूनही एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध असतील. 2027 साली होणाऱ्या वनडे वर्ल्डकप मध्ये ते दोघं खेळतील
त्या शक्यतेबद्दल गंभीरला विचारण्यात आले. यावर गंभीर म्हणाला, “ हे अजून खूप दूर आहे. त्यापूर्वी टी-20 वर्ल्डकप आहे, ती एक मोठी टूर्नामेंट असून भारतात पार पडणार आहे. त्यामुळे आगामी इंग्लंड कसोटी दौऱ्यानंतर संपूर्ण फोकस त्यावरच असेल. 2027 चा वर्ल्डकप अजून अडीच वर्षे दूर आहे. मी नेहमीच एक गोष्ट म्हणतो की जर तुम्ही कामगिरी करत राहिलात तर वय फक्त हा फक्त एक आकडा असतो” असं गंभीरने नमूद केलं. . म्हणजेच, रोहित आणि विराट 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात सहभागी होतील की नाही हे त्यांच्या कामगिरीवर अवलंबून असेल.