कधी अन् कसं जुळलं नातं? अर्जुन-सानिया एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? लव्ह स्टोरीचं ते गुपित समोर!

क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा नुकताच साखरपुडा झालाय. अर्जुन तेंडुलकर हादेखील एक क्रिकेटरच आहे. मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्याशी तो लवकरच लग्न करणार आहे.

कधी अन् कसं जुळलं नातं? अर्जुन-सानिया एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? लव्ह स्टोरीचं ते गुपित समोर!
arjun tendulkar and sania chandok love story
| Updated on: Aug 14, 2025 | 2:45 PM

Arjun Tendulkar Sania Chandok Love Story : क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा नुकताच साखरपुडा झालाय. अर्जुन तेंडुलकर हादेखील एक क्रिकेटरच आहे. मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्याशी तो लवकरच लग्न करणार आहे. दरम्यान, आता लवकरच अर्जुन आणि सानिया लग्न करणार असले तरी त्यांच्या प्रेमाची कहाणी नेमकी काय आहे? ते एकमेकांच्या प्रेमात नेमके कसे पडले? असे विचारले जात आहे.

सानिया चालवते प्राण्यांचे स्पा सेंटर

सानिया चंडोक ही एक प्राणीप्रेमी आहे. तिने लंडन स्कुल ऑफ इकोनॉमिक्स येथून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती पेट इंडस्ट्रीकडे वळली. तिचे स्वत:चे एक आलिशान असे पेट स्पा सेंटर आहे. मुंबईत असलेल्या तिच्या स्पा सेंटरचे नाव Mr. Paws Pet Spa & Store LLP असे आहे. या कंपनीची वार्षिक कमाई साधारण 90 लाख रुपये आहे.

तिच्या या स्पा सेंटरमध्ये श्वान, मांजर तसेच इतर पाळीव प्राण्यांचे ग्रुमिंग केले जाते. कोरियन, जॅपनिज थेरेपीच्या माध्यमातून या प्राण्यांवर तिथे मसाज केले जाते. दरम्यान, हीच सानिया आता अर्जुन तेंडुलकरची बायको आणि सचिन तेंडुलकरची सून होणार असल्याने ती अर्जुन तेंडुलकरच्या प्रेमात नेमकी कशी पडली ते जाणून घेऊया.

लव्ह स्टोरी नेमकी कशी जुळून आली?

सानिया चंडोक आणि अर्जुन तेंडुलकर हे अगोदरच एकमेकांना ओळखतात. दोघांचे कुटुंबीयदेखील एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. विशेष म्हणजे सानिया चंडोक आणि अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा तेंडुलकर या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. सारा तेंडुलकरच्या माध्यमातून सानिया आणि अर्जुन एकमेकांना नेहमी भेटायचे. विशेष म्हणजे सारा तेंडुलकरनेच अर्जुन आणि सानियाची भेट घडवून आणली होती.

मैत्रीचे झाले प्रेमात रुपांतर

या भेटीनंतर सानिया आणि अर्जुन यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. सारा तेंडुलकरमुळे सानिया आणि अर्जुन यांची प्रेमकहाणी जुळून आली. आता त्यांचा साखरपुडा झाला आहे. लवकरचे ते विवाहबंधनात अडकणार आहे. अद्याप त्यांच्या लग्नाची तरीख समोर आलेली नाही. मात्र लवकरच ते लग्न करतील असे सांगितले जात आहे.