
मेलबर्न : काल झालेल्या टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) मॅचमध्ये चाहत्यांनी मॅचचा पुरेपूर आनंद लुटला. कारण शेवटच्या बॉलपर्यंत चाललेल्या रोमहर्षक मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. तेव्हापासून टीम इंडियामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या हार्दीक पांड्या (Hardik Pandya)आणि विराट कोहलीची पुन्हा सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
प्रथम फलंदाजी करीत असताना पाकिस्तानची फलंदाजी चांगली झाली नाही. तसेच महत्त्वाचे खेळाडू लवकर बाद झाले, त्यामुळे पाकस्तानची धावसंख्या कमी झाली.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या काळात भेदक गोलंदाजी केल्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांना अधिक धावा करता आल्या नाहीत, परंतु टीम इंडियाच्या अंतिम ओव्हरमध्ये अधिक धावा गेल्याचं पाहायला मिळालं.
आता माझ्या डोक्यातून पराजयाचं भय पुर्णपणे निघून गेलं आहे, आता पुर्वीसारखा मी अधिक विचार करीत नाही. त्यामुळे माझ्याकडून चांगली कामगिरी होत आहे, असं विधान हार्दीक पांड्याने केलं आहे.