IND vs AUS : टेस्टमध्ये फेल वनडेत बेस्ट, केएल राहुलची अर्धशतकी खेळी आणि मीम्सचा वर्षाव

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत फेल ठरलेल्या केएल राहुलने पहिल्या वनडेत अर्धशतकी खेळी केली आहे. त्याच्या या खेळीमुळे भारताला विजय मिळवता आहे. पाच गडी झटपट बाद झाले असताना त्याने डाव सावरला.

IND vs AUS : टेस्टमध्ये फेल वनडेत बेस्ट, केएल राहुलची अर्धशतकी खेळी आणि मीम्सचा वर्षाव
केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताचा विजय, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 17, 2023 | 9:12 PM

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या वनडेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 5 गडी आणि 61 चेंडू राखून पराभव केला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 188 बाद झाला आणि विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 5 गडी गमवून 39.5 षटकात पूर्ण केलं. या विजयात मोलाची कामगिरी बजावली ती केएल राहुलने. भारतीय संघ अडचणीत असताना त्याने सावध खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.

कसोटी सामन्यात सलग फेल होत असल्याने त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत त्याला वगळण्यात आलं. मात्र वनडेत त्याची पुन्हा निवड झाल्याने टीका करण्यात आली होती. पहिल्या वनडेत केएल राहुलने नाबाद 75 धावांची खेळी केली. यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे.

टीम इंडियाकडून केएल राहुल याने सर्वाधिक 91 बॉलमध्ये नाबाद 75 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 7 चौकार आणि 1 सिक्स खेचला. तर रविंद्र जडेजा याने 69 बॉलमध्ये 5 चौकारांसह नॉट आऊट 45 रन्स केल्या. त्याशिवाय कॅप्टन हार्दिक पंड्याने याने 25 आणि शुबमन गिल याने 20 धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने 3 आणि मार्क्स स्टोयनिसने 2 विकेट्स घेतल्या. तीन सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवत भारताने 1-0 ने आघाडी मिळवली आहे.

ऑस्ट्रेलियाचा डाव

ऑस्ट्रेलियाची सुरुवात डळमळीत झाली. दुसऱ्या षटकात ट्रेव्हिस हेड 5 धावा करून माघारी परतला. त्यानंतर मिशेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ जोडीने 72 धावांची भागीदारी केली. स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर खेळाडू झटपट बाद झाले.  यानंतर मार्नस लाबुशेन मैदानात आला. तिसऱ्या विकेटसाठी मिचेल मार्श याने लाबुशेनसह 52 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्श शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र मिचेल याला रविंद्र जडेजाने आपल्या बॉलिंगवर मोहम्मद सिराज याच्या हाती कॅच आऊट केलं. मार्शने 65 बॉलमध्ये 10 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. मिचेल आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाची 4 बाद 129 अशी स्थिती झाली होती. मार्नस लाबुशेन 15, जोश इंग्लिस 26, कॅमरुन ग्रीन 12, ग्लेन मॅक्सवेल 8 आणि मार्कस स्टोइनिस 5 धावा करून बाद झाले.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कॅप्टन), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया – ट्रेव्हिस हेड, मिशेल मार्श, स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस, कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, सीन अब्बोट, मिशेल स्टार्क, एडम झाम्पा.