IND vs BAN : बांग्लादेशचे हे 5 खेळाडू टीम इंडियासाठी ठरु शकतात धोकादायक, कधीही घडवू शकतात उलटफेर

IND vs BAN : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडिया आणि बांग्लादेश परस्पराविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियाने हा सामना सहजतेने घेऊ नये, कारण बांग्लादेशची टीम सुद्धा उलटफेर घडवू शकते. आम्ही तुम्हाला बांग्लादेशच्या त्या पाच खेळाडूंविरुद्ध सांगणार आहोत, जे भारतासाठी धोकादायक ठरु शकतात.

IND vs BAN : बांग्लादेशचे हे 5 खेळाडू टीम इंडियासाठी ठरु शकतात धोकादायक, कधीही घडवू शकतात उलटफेर
Bangladesh Cricketer
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 18, 2025 | 8:27 AM

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपला पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांग्लादेश विरुद्ध खेळणार आहे. बांग्लादेशसाठी सुद्धा ही ओपनिंग मॅच आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया फक्त फेवरेटच नाहीय, तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. बांग्लादेशवर टीम इंडिया नेहमीच भारी पडली आहे. पण बांग्लादेशच्या टीमने सुद्धा महत्त्वाच्या सामन्यात नेहमीच टीम इंडियाला टक्कर दिली आहे, हे विसरुन चालणार नाही. बांग्लादेशच्या टीममध्ये सुद्धा उलटफेर घडवण्याची क्षमता आहे. आम्ही तुम्हाला बांग्लादेशच्या त्या पाच खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे टीम इंडियासाठी धोकादायक ठरु शकतात.

हा प्लेयर निर्माण करु शकतो आव्हान

टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. दुबईची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल ठरते. बांग्लादेशचा स्टार बॉलर मुस्तफिजुर रहमान टीम इंडियासमोर आव्हान निर्माण करु शकतो. तो आयपीएलमध्ये सुद्धा खेळतो. भारतीय क्रिकेटपटूंच्या खेळाची त्याला कल्पना आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या 10 हजारपेक्षा जास्त धावा

महमुदुल्लाह बांग्लादेशचा अनुभवी खेळाडू आहे. तो बऱ्याच काळापासून बांग्लादेशच्या टीमसाठी खेळतोय. त्याच्या अनुभवाचा बांग्लादेशच्या टीमला फायदा होऊ शकतो. आक्रमक बॅटिंग करण्याची महमुदुल्लाहची क्षमता आहे. बांग्लादेशसाठी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याने 10 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

त्याचा इकोनॉमी रेट 5.67

29 वर्षांचा तस्कीन अहमद टीम इंडिया विरुद्ध अनेक सामने खेळला आहे. उंचपुरा हा गोलंदाज दुबईच्या पीचवर टीम इंडियासाठी धोकादायक ठरु शकतो. भारताविरुद्ध 7 वनडे सामन्यात त्याने 14 विकेट घेतले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 5.67 आहेत.

भारताविरुद्ध त्याचा शानदार रेकॉर्ड

37 वर्षाच्या मुशफिकुर रहीमचा बांग्लादेशच्या दिग्गज खेळाडूंमध्ये समावेश होतो. टीमसाठी फलंदाजी करण्याशिवाय तो विकेटकीपिंगमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतो. भारताविरुद्ध त्याचा शानदार रेकॉर्ड आहे. वनडेमध्ये टीम इंडिया विरुद्ध त्याने तीन हाफ सेंचुरी आणि एक शतक झळकावलं आहे.

या ऑलराऊंडरपासून सावध राहण्याची गरज

मेहदी हसन मिराजने बांग्लादेशसाठी सातत्यपूर्ण प्रदर्शन केलय. 27 वर्षांचा हा ऑलराऊंडर आपल्या गोलंदाजीशिवाय फलंदाजीसाठी सुद्धा ओळखला जातो. भारत दौऱ्यावर आपल्या खेळाने त्याने भारतीय खेळाडूंना हैराण केलं होतं. टीम इंडियाला बांग्लादेशच्या या युवा खेळाडूपासून सावधान राहण्याची गरज आहे.