IND vs NZ : मला त्यांचं नाव घ्यायच नाही, पण… पराभवाच्या खलनायकांवर गावस्कर यांचं स्पष्ट भाष्य

IND vs NZ : या सीरीजमध्ये विराट कोहलीने दमदार परफॉर्मन्स केला. त्याने 93,23 आणि 124 धावा केल्या. रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांच्या अपयशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

IND vs NZ : मला त्यांचं नाव घ्यायच नाही, पण... पराभवाच्या खलनायकांवर गावस्कर यांचं स्पष्ट भाष्य
Sunil Gavaskar
| Updated on: Jan 19, 2026 | 11:47 AM

भारतीय क्रिकेट सध्या अडचणीत आहे. दोन वर्षांपूर्वी मालिकेत न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला होता. दशकातील हा सर्वात वेदनादायी पराभव होता. आता वनडे सीरीजमध्ये पराभव झाला आहे. मायदेशात भारताने पहिल्यांदाच न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावली. मूळात भारताने विजयी सुरुवात केली होती. पण न्यूझीलंडने मागून येऊन दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकली. कालच्या सामन्यात न्यूझीलंडची खराब सुरुवात झालेली. 5 धावांवर 2 विकेट गेले होते. पण तरीही त्यांनी 7 बाद 338 धावांचा डोंगर उभारला. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव 296 धावांवर आटोपला. विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. विराटचं करिअरमधील हे 54 वं वनडे शतक आहे. भारताचा 41 धावांनी पराभव झाला.

भारताच्या मालिका गमावण्यावर सुनील गावस्कर यांनी भाष्य केलं आहे. या सीरीजमध्ये विराट कोहलीने दमदार परफॉर्मन्स केला. त्याने 93,23 आणि 124 धावा केल्या. रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांच्या अपयशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुनील गावस्कर यांनी कोणाच्या व्यक्तिगत परफॉर्मन्सवर बोलण्याऐवजी एकूणच निकालाचं विश्लेषण केलं. खेळाडू मैदानावर कशी डुलकी घेत होते, न्यूझीलंडच्या खेळाडूंना कसं सहजतेने स्ट्राइक रोटेट करु दिलं, याकडे गावस्करांनी लक्ष वेधलं.

रोहित शर्माची चपळाई दिसली

“मला कोणाचं नाव घ्यायचं नाही. पण काही जणांनी एकेरी धावा सहज पळू दिल्या. रोहित शर्माची चपळाई दिसली. विराट कोहली बद्दल बोलायचं झाल्यास तो मैदानावर कशा प्रकारचा अॅथलीट आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. मला असं वाटतं क्षेत्ररक्षणात चपळाई अजून दिसायला पाहिजे होती” सायमन डुलसोबत चर्चा करताना गावस्कर म्हणाले. डेवॉन कॉनवे आणि हेनरी निकोलस या न्यूझीलंडच्या दोन्ही ओपनर्सना अर्शदीप सिंह आणि हर्षित राणाने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यावेळी सामना भारताच्या नियंत्रणात होता. पण त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी सामना भारताच्या हातून खेचून नेला. चौथ्या विकेटसाठी दोघांनी 219 धावांची भागीदारी केली.

गावस्कर यांनी पहिल्यांदा चिंता व्यक्त केलेली नाही

रवींद्र जाडेजाने फिल्डिंग करताना जबरदस्त कॅच घेतली. पण फलंदाजीत आपलं योगदान देण्यात तो कमी पडला. भारताच्या पराभवाबद्दल गावस्कर यांनी पहिल्यांदा चिंता व्यक्त केलेली नाही. दुसर्‍या सामन्यात न्यूझीलंडने ज्या सहजतेने 285 धावांचं टार्गेट चेज केलं, त्यावेळी सुद्धा गावस्कर यांनी चिंता व्यक्त केलेली.