IND vs WI : भारतीय बॉलर वेस्ट इंडिजकडून इतके मार खातायत की शेवटी सीरीज जिंकण्यासाठी हुकूमी एक्का आणावाच लागला
IND vs WI : टीम इंडियाने पाचव्या टी20 सामन्यासाठी संघात एक महत्वपूर्ण बदल केला आहे. पाचवा आणि अखेरचा सामना 17 ऑक्टोंबरला 2026 ला बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

IND vs WI 5th T20I : वेस्ट इंडिज विरुद्ध पाच टी20 सामन्यांची सीरीज सुरु आहे. पाचव्या आणि अखेरच्या टी20 सामन्यासाठी भारताच्या गोलंदाजी चमूत मोठा बदल झाला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे भारताच्या पुरुष सीनियर सिलेक्शन कमिटीने अनुभव स्विंग गोलंदाज भवुनेश्वर कुमारचा टीममध्ये समावेश केला आहे. बंगळुरुमध्ये सीरीजमधला शेवटचा टी20 सामना होणार आहे. सीरीज सध्या 2-2 अशी बरोबरीत आहे. पाचवा आणि अखेरचा सामना 17 ऑक्टोंबरला 2026 ला बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.
बुधवारी हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर चौथा टी20 सामना झाला. त्यावेळी अर्शदीप सिंहला दुखापत झाली होती. फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली. अर्शदीपच्या दुखापतीची गंभीरता लक्षात घेऊन मेडिकल टीमचं त्याच्यावर लक्ष आहे. बंगळुरुमध्ये तो शेवटचा सामना खेळणार की नाही याचा निर्णय 17 ऑक्टोंबरला सामना सुरु होण्याआधी केला जाईल. अर्शदीपचा फिटनेस आणि रिकवरीच्या आधारावर हा निर्णय घेतला जाईल.
न्यूझीलंड दौऱ्याआधी ही मोठी संधी
भुवनेश्वार कुमारसाठी न्यूझीलंड दौऱ्याआधी ही मोठी संधी आहे. न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या पाच टी20 सामन्यांच्या सीरीजसाठी त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. भुवनेश्वर कुमार 36 वर्षांचा आहे. वयामुळे मागच्या काही वर्षांपासून तो टीमच्या बाहेर होता. भुवनेश्वर कुमारला नोव्हेंबर 2022 पासून टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. अनेक वर्षानंतर तो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये परतणार आहे.
भारताची अपडेटेड T20I टीम :
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, प्रिंस यादव, मयंक यादव, नमन धीर, भुवनेश्वर कुमार.