‘बुद्धिबळ खेळत असताना, प्रेक्षक खेळापेक्षा माझ्या….’, नागपूरच्या दिव्या देशमुखचा गंभीर आरोप

| Updated on: Jan 30, 2024 | 4:09 PM

"पुरुष खेळाडू मात्र त्यांच्या गेमसाठी चर्चेत असतात. महिला खेळाडूंना मात्र, चेस बोर्डवरील त्यांच्या क्षमतेपेक्षा अन्य गोष्टींसाठी जज केलं जातं. महिला किती चांगल्या चेस खेळतात, त्यांची क्षमता याकडे लक्ष दिल जात नाही, हे एक मनाला लागणार सत्य आहे"

बुद्धिबळ खेळत असताना, प्रेक्षक खेळापेक्षा माझ्या...., नागपूरच्या दिव्या देशमुखचा गंभीर आरोप
Divya Deshmukh
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली : भारताची महिला बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने अत्यंत गंभीर आरोप केला आहे. एका आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत खेळत असताना प्रेक्षकांच्या लैंगिक नजरांचा सामना करावा लागला, असं तिने म्हटलं आहे. नेदरलँड्समध्ये नुकत्याच झालेल्या टाटा स्टिल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या सहभागी झाली होती. स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांच लक्ष मी कशी खेळते यापेक्षा, माझे केस, कपडे आणि उच्चार कसे करते यावर होतं, असा दिव्या देशमुखने आरोप केला आहे. 18 वर्षाची दिव्या नागपूरची असून ती आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहे. मागच्यावर्षी आशियाई महिला चेस चॅम्पियनशिपचा किताब तिने जिंकला होता.

दिव्या देशमुखने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिला आलेला एक कटू अनुभव सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. महिला बुद्धिबळपटूना महिलाद्वेषाचा कशाप्रकारे सामना करावा लागतो, याकडे तिने लक्ष वेधल आहे. “मला या मुद्याकडे आधीपासूनच लक्ष वेधायच होतं. पण माझी स्पर्धा संपेपर्यंत मी थांबले होते. बुद्धिबळाच्या खेळात प्रेक्षकांकडून महिला गृहित धरल जातं” असा दिव्या देशमुखने म्हटलय.

‘प्रेक्षकांना खेळाशी काही देण-घेण नाहीय’

“व्यक्तीगत पातळीवर मला या स्पर्धेत आलेला अनुभव हे ताज उदहारण आहे. मी काही चाली खेळले. मला माझा खेळ चांगला वाटला, मला त्याचा अभिमान आहे. काही लोकांनीच मला सांगितलेलं की, प्रेक्षकांना खेळाशी काही देण-घेण नाहीय. पण त्याऐवजी ते माझे कपडे, केस आणि उच्चार आणि अन्य संबंध नसलेल्या गोष्टींकडे लक्ष देत होते” दिव्या देशमुखने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हा अनुभव लिहिलाय.


‘महिला खेळाडूंना अजूनही लैंगिक नजरांचा सामना करावा लागतो’

टाटा स्टिल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत 4.5 गुणासह देशमुखला 12 व्या स्थानावर समाधान मानाव लागल. पुरुष खेळाडूंच्या बाबतीत मात्र अस होत नाही, असं दिव्या देशमुखने लिहिलय. “पुरुष खेळाडू मात्र त्यांच्या गेमसाठी चर्चेत असतात. महिला खेळाडूंना मात्र, चेस बोर्डवरील त्यांच्या क्षमतेपेक्षा अन्य गोष्टींसाठी जज केलं जातं. महिला किती चांगल्या चेस खेळतात, त्यांची क्षमता याकडे लक्ष दिल जात नाही, हे एक मनाला लागणार सत्य आहे” असं दिव्या देशमुखने लिहिलय. महिला खेळामध्ये बक्षिसाची जी रक्कम आहे, त्यामध्ये प्रगती झालीय. पण महिला खेळाडूंना अजूनही लैंगिक नजरांचा सामना करावा लागतो. त्यांच्या कपड्यांबद्दल बोलल जातं