IND vs PAK: विजय भारताने हिसकावला, हरल्यानंतर पाक कर्णधारानं जे कारण दिलं ते ऐकून तुम्हालाही हसू येईल

IND vs PAK Final Match 2026: भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल सामना रंगला जो अतिशय थरारक होता. शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाने विजय मिळवला, हाताशी आलेला विजयाचा घास भारतीय संघाने हिसकावल्यानंतर पाक कर्णधार काय म्हणाला?

IND vs PAK: विजय भारताने हिसकावला, हरल्यानंतर पाक कर्णधारानं जे कारण दिलं ते ऐकून तुम्हालाही हसू येईल
| Updated on: Nov 15, 2026 | 8:34 AM

IND vs PAK U19 Mens Asia Cup 2026: अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण त्यांना विजेतेपद पटकावता आले नाही. भारताने शेवटच्या चेंडूवर एका गडीने सामना जिंकून ट्रॉफीवर नाव कोरले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ३३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने ३३९ धावा करून सामना जिंकला. आता, या पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधार फरहान युसूफने याचे कारण स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानचा कर्णधार विजयाचा घास भारताने हिसकावल्यानंतर काय म्हणाला?

Loading...

फरहानने कबूल केले की, “माझ्या संघाने चांगली धावसंख्या उभारली होती, पण भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळले. प्रत्येकजण आपापले काम व्यवस्थित करत होता, पण दुर्दैवाने आमची गोलंदाजी अचूक नव्हती. त्यामुळेच आम्ही हरलो. माझा संघ तीन वेगवान गोलंदाजांसह खेळत होता आणि सर्व गोलंदाजांना लय पकडायला वेळ लागत होता. यामुळे संघाची गती मंदावली. अखेरीस, आम्हाला परिस्थितीनुसार आपल्या योजनांमध्ये बदल करावा लागला. मी चाहत्यांचे आभार मानतो आणि आपल्या संघाला पाठिंबा देत राहण्याचे आवाहन केले.”

थरारक मॅचमधील विजयानंतर लक्ष्य रायचंदानी म्हणाला की, “खेळपट्टी चांगली होती आणि भारतीय संघाला सुरुवातीपासूनच विश्वास होता की ते लक्ष्य गाठतील. खालच्या फळीतील फलंदाजांच्या योगदानाबद्दल तो म्हणाला की, त्याचा आपल्या खेळाडूंवर नेहमीच विश्वास होता. संघात आठव्या, नवव्या आणि जवळपास अकराव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करणारे खेळाडू होते, त्यामुळे खालच्या फळीकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्याला आश्चर्य वाटले नाही. त्याने भारतीय चाहत्यांचे आभार मानले आणि त्यांना संघाला पाठिंबा देत राहण्याचे आवाहन केले.”

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत ३३७/९ धावा केल्या. उस्मान खानने १०७ धावा केल्या. अब्दुल कादिरने ५४ चेंडूंमध्ये ८० धावा केल्या. कर्णधार फरहान युसूफने ६३ चेंडूंमध्ये ६० धावा करून संघाला ३०० धावांच्या पुढे नेले. भारताकडून, काव्या पटेलने ६८ धावांत चार बळी घेतले, तर सी. व्यंकटने ४० धावांत तीन बळी घेतले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us