India vd England 2nd T2OI | शानदार विजयानंतरही टीम इंडियाला मोठा धक्का

| Updated on: Mar 15, 2021 | 7:28 PM

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. मात्र या विजयानंतरही आयसीसीने टीम इंडियावर दंडात्मक कारवाई केली आहे.

India vd England 2nd T2OI | शानदार विजयानंतरही टीम इंडियाला मोठा धक्का
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. मात्र या विजयानंतरही आयसीसीने टीम इंडियावर दंडात्मक कारवाई केली आहे.
Follow us on

अहमदाबाद : भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडवर 7 विकेट्सने विजय (India vd Engaland 2nd T2OI) मिळवला. इंग्लंडने भारताला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान भारताने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मलिकेत 1-1 ने बरोबरी केली. दरम्यान या विजयानंतरही विराटसेनेला तगडा झटका बसला आहे. (india vs england 2nd t20i india fined 20 Percent of their match fees for slow over rate)

नक्की काय झालं?

दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने आवश्यक षटक गती राखली नाही. म्हणजेच स्लो ओव्हरेटमुळे भारताला झटका बसला आहे. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या सामन्याच्या एकूण मॅच फीच्या 20 टक्के रक्कम दंड ठोठावण्यात आला आहे. नियमांनुसार एका तासामध्ये ठराविक षटकांचा खेळ होणं अपेक्षित असंत. तसं न झाल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे. क्रिकबझने याबाबतचे वृत्त दिले आहे. ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडियाने निर्धारित वेळेत अपेक्षित षटकांपैकी 1 षटक कमी टाकलं. त्यामुळे आयसीसीने ही दंडात्मक कारवाई केली.

इशानची पदार्पणात शानदार कामिगरी

आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या इशान किशनने दुसऱ्या टी 20 सामन्यातून पदार्पण केलं. त्याने या पदार्पणातील सामन्यात बॅटने अफलातून कामगिरी केली. इशानने 32 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. पदार्पणात अशी कामगिरी करणारा तो अजिंक्य रहाणेनंतर दुसराच भारतीय ठरला. त्याला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले.

मालिकेत बरोबरी

भारताने दुसरा सामना जिंकून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. दरम्यान या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी 16 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

तिसऱ्या सामन्यासाठी संभावित टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, रिषभ पंत(यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर , भुवनेश्वर कुमार, आणि युझवेंद्र चहल.

संबंधित बातम्या :

Suryakumar Yadav | टी 20 डेब्यूनंतर मुंबईकर सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

32 चेंडूत 56 रन्स कशा ठोकल्या? नेमकी कशाची मदत झाली? इशान म्हणतो…

India vs England 2021, 2nd T20 | विराटचा दणका, इशानचा झंझावात, इंग्लंडवर 7 विकेट्सने मात, मालिकेत 1-1 ने बरोबरी

(india vs england 2nd t20i india fined 20 Percent of their match fees for slow over rate)