India vs England 2021, 2nd T20 | विराटचा दणका, इशानचा झंझावात, इंग्लंडवर 7 विकेट्सने मात, मालिकेत 1-1 ने बरोबरी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20 सामना लाईव्ह (india vs england 2nd t20 live score)

India vs England 2021, 2nd T20 | विराटचा दणका, इशानचा झंझावात, इंग्लंडवर 7 विकेट्सने मात, मालिकेत 1-1 ने बरोबरी
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20 सामना लाईव्ह (india vs england 2nd t20 live score)

|

Mar 14, 2021 | 11:37 PM

अहमदाबाद : टीम इंडियाने   दुसऱ्या टी 20 सामन्यात (India vs England 2021 2nd T20) इंग्लंडवर 7 विकेट्सने मात केली आहे. यासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. कर्णधार विराट कोहली आणि पदार्पणवीर इशान किशन या दोघांनी विजयी खेळी साकारली. विराट कोहलीने नाबाद 67 धावा केल्या. तर इशान किशनने 56 धावांची खेळी केली. तर पंतनेही 26 धावांची खेळी केली. (india vs england 2nd t20 live score updates in marathi narendra modi stadium ahmedabad ind vs eng 2021 t20i cricket match news online) लाईव्ह स्कोअरकार्ड

Key Events

मालिकेत 1-1 ने बरोबरी

टीम इंडियाने दुसरा सामना जिंकत 5 साम्न्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. कर्णधार विराट कोहली आणि पदार्पणवीर इशान किशन या दोघांनी विजयी खेळी साकारली. दोघांनी अर्धशतकी खेळी केली.

इशानचे किशनचे पदार्पणात अर्धशतक

इशान किशनने पदार्पणातील सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी केली. इशान पदार्पणात अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. इशानने 32 चेंडूत 56 धावांची झंझावाती खेळी केली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 14 Mar 2021 10:38 PM (IST)

  सिक्स खेचत विराटने टीम इंडियाला विजय मिळवून दिला

  कर्णधार विराट कोहलीने सिक्स खेचत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. यासह टीम इंडियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. विराटने नाबाद  73 तर पदार्पणवीर इशान किशनने 56 धावांची खेळी केली.

 • 14 Mar 2021 10:17 PM (IST)

  सिक्ससह कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक

  कर्णधार विराट कोहलीने सिक्स खेचत 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटच्या टी 20 कारकिर्दीतील 26 वं अर्धशतक ठरलं आहे. दरम्यान टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे.

 • 14 Mar 2021 10:11 PM (IST)

  टीम इंडियाला तिसरा धक्का

  टीम इंडियाला तिसरा धक्का बसला आहे. रिषभ पंत आऊट झाला आहे. पंतने 13 चेंडूत प्रत्येकी 2 चौकार आणि षटकारांसह 26 धावांची खेळी केली.

 • 14 Mar 2021 10:08 PM (IST)

  रिषभ पंतचा जोरदार सिक्स

  पंतने ख्रिस जॉर्डनच्या बोलिंगवर भन्नाट सिक्स मारला आहे. यासह पंत 26 धावांवर पोहचला आहे.

 • 14 Mar 2021 09:57 PM (IST)

  पंतचा भन्नाट सिक्स

  रिषभ पंतने सामन्यातील 12 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर आदिल राशिदच्या बोलिंगवर 90 मीटर लांब षटकार मारला आहे.

 • 14 Mar 2021 09:53 PM (IST)

  टीम इंडियाला दुसरा धक्का

  टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे.  सलामीवीर इशान किशन आऊट झाला आहे. इशानने 32 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावांची खेळी केली.

 • 14 Mar 2021 09:49 PM (IST)

  सलग 2 षटकार खेचत इशानचे अर्धशतक

  इशान किशनने सलग 2 चेंडूत सिक्सर खेचत पदार्पणातील सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. आदिल राशिद सामन्यातील 10 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील पहिल्या 2 चेंडूवर सिक्स खेचत इशानने अर्धशतक झळकावलं. इशानने 28 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने पहिलंवहिलं अर्धशतक पूर्ण केलं.

 • 14 Mar 2021 09:40 PM (IST)

  इशान किशनला जीवनदान

  विराटनंतर इशान किशनला 41 धावांवर जीवनदान मिळालं आहे. सामन्यातील 8 वी ओव्हर आदिल रशीद टाकत होता. या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर इशानने फटका लगावला. इशानने मारलेला फटका थेट बेन स्टोक्सच्या हातात जाऊन बसला. पण स्टोक्सला झेल नीट टिपता आला नाही. त्यामुळे चेंडू हातातून सटकला. यासह इशानला जीवनदान मिळालं.

 • 14 Mar 2021 09:35 PM (IST)

  इशानचा झंझावात, बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर शानदार सिक्स

  इशान किशनने सातव्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर शानदार सिक्स चोपला.

 • 14 Mar 2021 09:33 PM (IST)

  फ्री हीटवर विराटचा सिक्सर

  सामन्यातील 7 व्या ओव्हरमधील दुसरा चेंडू बेन स्टोक्सने नो बॉल टाकला. त्यामुळे फ्री हीट मिळाला. या फ्री हीटचा कर्णधार विराटने चांगला फायदा घेतला. विराटने या फ्री हीटवर सिक्स खेचला.

 • 14 Mar 2021 09:32 PM (IST)

  विराट कोहली आणि इशान किशनची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

  इशान किशन आणि विराट कोहलीने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये अर्धशतकी भागीदारी केली आहे. टीम इंडियाने पहिली विकेट शून्यावर गमावली. मात्र त्यानंतर इशानने विराटसह फटकेबाजी करत टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवले.

 • 14 Mar 2021 09:26 PM (IST)

  इशान किशनचा शानदार सिक्स

  इशान किशनने सामन्यातील सहाव्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर अफलातून सिक्स खेचला आहे. इशानने टॉम करनच्या बोलिंगवर सिक्स मारला. यासह इशान 18 धावांवर पोहचला.

 • 14 Mar 2021 09:23 PM (IST)

  विराट कोहलीला जीवनदान

  कर्णधार विराट कोहलीला जीवनदान मिळालं आहे. पाचव्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर  विराटला  जीवनदान मिळालं.  विकेटकीपर जोस बटलरने विराट 10 धावांवर खेळत असताना कॅच सोडला.

 • 14 Mar 2021 09:09 PM (IST)

  इशान किशनची चौकारासह सुरुवात

  इशानने आपल्या टी 20 कारकिर्दीतील पहिली धाव चौकार लगावत मिळवली आहे.  इशानने जोफ्रा आर्चरच्या बोलिंगवर चौकार लगावला.

 • 14 Mar 2021 09:07 PM (IST)

  टीम इंडियाला पहिला धक्का

  टीम इंडियाची वाईट सुरुवात झाली आहे. भारताने शून्यावर पहिली विकेट गमावली आहे. सलामीवीर केएल राहुल भोपळा न फोडता माघारी परतला आहे. केएल बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला आहे.

 • 14 Mar 2021 08:59 PM (IST)

  टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 165 धावांचे आव्हान

  टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. इशान किशन आणि के एल राहुल सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले आहे.

 • 14 Mar 2021 08:51 PM (IST)

  भारताला विजयासाठी 165 धावांचे आव्हान

  इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले आहे. इंग्लंडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 164 धावा केल्या. इंग्लंडकडून सलामीवीर जेसन रॉयने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर कर्णधार इयॉन मॉर्गनने 28 धावा केल्या. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट मिळवली.

 • 14 Mar 2021 08:39 PM (IST)

  इंग्लंडला पाचवा धक्का

  शार्दुल ठाकूरने  इंग्लंडला पाचवा धक्का दिला आहे. शार्दुलने  कर्णधार इयॉन मॉर्गनला आऊट केलं आहे. मॉर्गनने 28 धावा केल्या.

 • 14 Mar 2021 08:25 PM (IST)

  इंग्लंडला चौथा दणका

  इंग्लंडला चौथा धक्का बसला आहे. वॉशिंग्टन सुंदरने जॉनी बेयरस्टोला सूर्यकुमारच्या हाती कॅच आऊट केलं. जॉनीने 20 धावा केल्या.

 • 14 Mar 2021 08:15 PM (IST)

  इयॉन मॉर्गनचा चौकार, इंग्लंड शंभरी पार

  इंग्लंडने 100 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

 • 14 Mar 2021 08:12 PM (IST)

  इंग्लंडला तिसरा धक्का

  भुवनेश्वर कुमारने इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे. भुवनेश्वरने सलामीवीर जेसन रॉयला 46 धावांवर वॉशिंग्टन सुंदरच्या हाती कॅच आऊट केलं आहे.

 • 14 Mar 2021 07:51 PM (IST)

  इंग्लंडला दुसरा धक्का

  इंग्लंडला दुसरा धक्का बसला आहे.  डेव्हीड मलान आऊट झाला आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलने मलानला आऊट केलं आहे. मलानने 24 धावांची खेळी केली.

 • 14 Mar 2021 07:34 PM (IST)

  इंग्लंडच्या पावरप्लेमध्ये 44 धावा

  इंग्लंडने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून  44 धावा केल्या आहेत. दरम्यान मैदानात जेसन रॉय आणि डेव्हिड मलान खेळत आहेत.

 • 14 Mar 2021 07:07 PM (IST)

  जेसन रॉयचा उत्तुंग षटकार

  जेसन रॉयने सामन्यातील दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरच्या बोलिंगवर जोरदार सिक्स खेचला.

 • 14 Mar 2021 07:05 PM (IST)

  इंग्लंडला पहिला धक्का

  इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे. भुवनेश्वर कुमारने जोस बटलरला शून्यावर एलबीडबल्यू आऊट केलं आहे.

 • 14 Mar 2021 07:02 PM (IST)

  इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात

  इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. जोस बटलर आणि जेसन रॉय सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. 
   
 • 14 Mar 2021 06:43 PM (IST)

  इंग्लंडचे अंतिम 11 खेळाडू

  इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जोस बटलर, डेव्हीड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, सॅम करन, टॉम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन आणि आदिल राशिद

 • 14 Mar 2021 06:40 PM (IST)

  अशी आहे टीम इंडिया

  विराट कोहली (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, रिषभ पंत(यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर , भुवनेश्वर कुमार, आणि युझवेंद्र चहल.

 • 14 Mar 2021 06:36 PM (IST)

  टीम इंडियामध्ये 2 बदल

  दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये 2 बदल करण्यात आले आहेत.  शिखर धवनच्या जागी युवा इशान किशनला संधी देण्यात आली आहे. तर अक्षर पटेलऐवजी सूर्यकुमार यादवला संधी मिळाली आहे. या निमित्ताने इशान आणि सूर्यकुमार यादवचे टी 20 पदार्पण झाले आहे.

 • 14 Mar 2021 06:33 PM (IST)

  टीम इंडियाने टॉस जिंकला

  टीम इंडियाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंग्लंड प्रथम बॅटिंग करणार आहे. तर विराटसेना विजयी धावांचं पाठलाग करेल.

 • 14 Mar 2021 06:02 PM (IST)

  टॉस फॅक्टर महत्वाचा

  सामन्यात टॉस महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे टॉसचा किंग कोण ठरणार, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

 • 14 Mar 2021 06:00 PM (IST)

  इंग्लंड टीम इंडियावर वरचढ

  आतापर्यंत उभय संघात एकूण 15 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी 8 सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला पराभूत केलं आहे. तर 7 सामन्यात भारताने इंग्लंडवर विजय मिळवला आहे.

 • 14 Mar 2021 05:59 PM (IST)

  दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये बदल होण्याची शक्यता

  इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे संघात बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डच्चू हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

Published On - Mar 14,2021 10:42 PM

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें