India vs England | इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत कोहलीला धोनीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची ‘विराट’ संधी

| Updated on: Jan 30, 2021 | 12:18 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

India vs England | इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत कोहलीला धोनीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची विराट संधी
महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली
Follow us on

चेन्नई : टीम इंडियाचे शिलेदार इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका  (England Tour India 2021) खेळण्यासाठी सज्ज आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर तर इंग्लंडने श्रीलंकेवर कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. यामुळे दोन्ही संघ या मालिकेसाठी उत्सुक आहेत. या कसोटी मालिकेच्या निमित्ताने टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीचं संघात पुनरागमन झालं आहे. विराटला या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. तसेच एका विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. (india vs england test series 2021 team india captain virat kohli have chance to break mahnedra singh dhoni record)

नक्की रेकॉर्ड काय आहे?

धोनीने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात भारतात सलग 9 कसोटी मालिका जिंकून दिल्या आहेत. तर विराटनेही सलग 9 टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवून दिला आहे. यामुळे विराटला धोनीचा हा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. तसंच धोनीने घरच्या मैदानात टीम इंडियाला 21 कसोटींमध्ये विजय मिळवून देण्याचा पराक्रम केला आहे. तर विराटनेही 20 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचा पराभव केला आहे. यामुळे विराटला धोनीच्या विक्रमाची बरोबरीची संधी आहे.

अजिंक्य रहाणेलाही संधी

अजिंक्य रहाणेला धोनीच्या कसोटीमधील धावांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. धोनीने एकूण 90 सामन्यांमधील 144 डावात 6 शतकांसह 4 हजार 876 धावा केल्या आहेत. तर रहाणेने 69 कसोटींमध्ये 117 डावात 12 शतकांसह 4 हजार 471 धावा केल्या आहेत. धोनीला पछाडण्यासाठी रहाणेला इंग्लंड विरुद्धच्या 4 सामन्यांच्या मालिकेत 406 धावा कराव्या लागतील. तसेच रहाणेने या मालिकेत एक शतक लगावल्यास तो पॉली उम्रीगर आणि मुरली विजय यांच्या कसोटी शतकांचा विक्रमही मोडीत काढेल. उम्रीगर, विजय आणि रहाणे या तिघांच्या नावे कसोटीत 12 शतकं आहेत.

या कसोटी मालिकेतील पहिले 2 सामने हे चेन्नई तर उर्वरित 2 कसोटी सामने हे अहमदाबादमध्ये खेळण्यात येणार आहेत. या पहिल्या 2 कसोटींसाठी दोन्ही संघ चेन्नईमध्ये दाखल झाले आहेत. हे दोन्ही संघ क्वारंटाईन झाले आहेत. या मालिकेतील पहिला सामन्याला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. चेन्नईतील या पहिल्या 2 सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नसणार आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.

संबंधित बातम्या :

India vs England | अश्विनला इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत विक्रमाची संधी, ठरणार चौथा भारतीय

Special Story | टीम इंडिया की इंग्लंड, कसोटी मालिकेत वरचढ कोण? पाहा आकडेवारी

(india vs england test series 2021 team india captain virat kohli have chance to break mahnedra singh dhoni record)