IND vs NZ: गंभीरने आधीच वॉर्निंग दिलेली, तरीही ‘रो-को’ ने तीच चूक केली, आता काही खरं नाही

IND vs NZ 5th ODI: भारत आणि पाकिस्तान यांच्यात वनडे सामन्यांची मालिका सुरु असून पाचवा सामना सुरु आहे. आता या शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली बाद झाला. यामुळे गंभीरने दिलेली वॉर्निंग आता जोर धरू लागली आहे.

IND vs NZ: गंभीरने आधीच वॉर्निंग दिलेली, तरीही रो-को ने तीच चूक केली, आता काही खरं नाही
| Updated on: Nov 15, 2026 | 10:09 AM

IND VS NZ ODI: भारत न्यूझीलंड यांच्यात वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या सामन्यांच्या मालिकेतील पाचवा वनडे सामना आता सुरु आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आणि टीम इंडिया बॅटिंगसाठी मैदानात उतरली. मैदानात उतरताच भारतीय संघाची फलंदाजी डसमळली. टॉप ऑडर्र कोसळल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर चाहत्यांच्या विशेष नजरा असतात पण ते दोघेच फेल ठरले. आता गौतम गंभीर यांनी आधीच एक वॉर्निंग दिली होती त्यात रोको पूर्णपणे फेल यामुळे आता पुढे काय होणार याबाबत चाहत्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे. 

आगामी वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्ती घेणार की काय अशी चर्चा आता पुन्हा रंगली आहे. हा दौरा शेवटचा असणार की काय असाही प्रश्न निर्माण होत आहे. अशातच या दोऱ्यातील मॅचमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना स्वस्तात माघारी जावे लागते. रोहित शर्मा सात धावा करुन बाद झाला. तर विराट कोहली पाच धावा करुन बाद झाला. तर सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने १८ केल्या. यामुळे टीम इंडियाची परिस्थिती ३४ वर तीन अशी होती.

Loading...

रोहित शर्माने चांगली सुरुवात करुन दिलेली पण त्याला त्याचा शेवट करता आलेला नाही. रोहितचा शेवटचा सामना पाहण्यासाठी त्याची पत्नी आणि मुलंही उपस्थित होते. परंतु रोहित शर्माला यांच्यासमोर मोठा धावा उभारत्या आल्या नाही. यामुळे रितीकाही नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनाही चांगली कामगिरी करता आलेली नाही. ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यरलाही विशेष काही करता आलेले नाही. 

गौतम गंभीरने मॅचपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट मत मांडले होते की, न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाच्या बॅटिंगचा मुद्दा विशेष जोर धरत आहे. बॅटर्सने पहिल्या १५ षटकांमध्ये टिकून राहिल्या पाहिजेत, असं गंभीर स्पष्ट म्हणाले होते, पण टीम इंडियाची टॉप ऑर्डर फेल गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसतंय. गंभीरची वॉर्निंग रोहित, विराट अन् ऋतुराज, श्रेयस अय्यर गांभिर्याने घेतली नाही का? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us