Ind Vs Pak: सामना पाहायला आलेल्या हार्दिक पांड्याच्या रूमर्ड गर्लफ्रेंडची चर्चा; कॅमेऱ्यात कैद

भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात हार्दिक पांड्याने मैदानावर आल्या आल्याच बाबर आझमला बाद करून सर्वांचे लक्ष वेधलं. पण त्याचवेळी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली ती पांड्याची रूमर्ड गर्लफ्रेंड. हार्दिक पांड्यांची रूमर्ड गर्लफ्रेंड हा सामना पाहायला आली होती. तिचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Ind Vs Pak: सामना पाहायला आलेल्या हार्दिक पांड्याच्या रूमर्ड गर्लफ्रेंडची चर्चा; कॅमेऱ्यात कैद
| Updated on: Feb 23, 2025 | 8:25 PM

दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर पाकिस्तानने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी संघाला फक्त 49.4 ओवरवरच रोखलं. पाकिस्तानची टीम 241 धावांवर ऑल आउट झाली. यात पहिला विकेट घेतला होता तो हार्दिक पंड्याने. त्याने मैदानावर येताच बाबर आझमला बाद केलं.

 हार्दिक पांड्याच्या रूमर्ड गर्लफ्रेंडची चर्चा

बाबर आझम आउट होताच, जेव्हा कॅमेरा स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांकडे वळला तेव्हा कॅमेऱ्यात एका मुलीचा चेहरा कैद झाला, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होऊ लागली आहे. ही मुलगी म्हणजे हार्दिक पंड्याची रूमर्ड गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जातं. पंड्याची रूमर्ड गर्लफ्रेंडचं नाव जास्मिन वालिया असून ती व्यवसायाने ब्रिटिश गायिका आहे, तीही या सामन्याला स्टेडियममध्ये हजर होती.

जास्मिनचे फोटो व्हायरल

बाबर आझम बाद झाल्यानंतर जास्मिन खूप आनंदी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. आता तिचे नाव हार्दिक पांड्याशी जोडले जात असल्याने सोशल मीडियावर त्याची अधिक चर्चा होताना दिसत आहे. आता जास्मिनचे फोटोही व्हायरल होत आहेत.

एकाच ठिकाणचे फोटो व्हायरल झाल्याने चर्चा 

हार्दिक पांड्या आणि जास्मिनचे नाव गेल्या बऱ्याच दिवसांपासून जोडलं जात आहेत. हार्दिक आणि नताशाचा 2024 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर पांड्या कुठेतरी व्हॅकेशनवर गेला होता. त्याने जे फोटो शेअर केले होते त्याच ठिकाणचे फोटो जास्मिननेही शेअर केले होते. त्यांनी हे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले होते. दोघांचेही फोटो एकाच ठिकाणाहून समोर आल्यानंतर, दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या. मात्र दोघांपैकी कोणीही याबद्दल कधीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हार्दिक पांड्याने किती विकेट घेतल्या?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने दोन विकेट आपल्या नावावर केल्या. त्याने प्रथम बाबर आझमला बाद केलं. 26 चेंडूत 23 धावा करून बाबर बाद झाला. त्यानंतर, सौद शकीलची विकेटही पंड्याने घेतली. सौदने 73 चेंडूत 62 धावा केल्या.