India vs South Africa LIVE Score, 2nd Test, DAY 3: आठ विकेट शिल्लक, दक्षिण आफ्रिका विजयापासून 122 धावा दूर

दोन्ही संघांना कसोटी विजयाची समान संधी आहे. भारतासाठी कसोटी कुठल्यादिशेने जाणार ते सर्वस्वी फलंदाजांवर अवलंबून आहे.

India vs South Africa LIVE Score, 2nd Test, DAY 3: आठ विकेट शिल्लक, दक्षिण आफ्रिका विजयापासून 122 धावा दूर
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 9:56 PM

जोहान्सबर्ग: जोहान्सबर्ग कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. आजच्या दिवसाच्या खेळावर दक्षिण आफ्रिकेचं वर्चस्व राहिलं. आज त्यांनी भारतीय फलंदाजांना खेळपट्टीवर फारवेळ टिकू दिलं नाही आणि गोलंदाजांना यशही मिळू दिलं नाही. आज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या जोडीने दोन बाद 85 वरुन डाव पुढे सुरु केला. सुरुवातीचा तासभर दोघांनी दमदार फलंदाजी केली व शानदार अर्धशतक झळकावली. (india vs south africa live score today 2nd test match day 3 scorecard Johannesburg Wanderers Stadium)

पण दोघे बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला. शार्दुल ठाकूर आणि हनुमा विहारीने प्रतिकार केला व भारताची धावसंख्या 250 पार पोहोचवली. भारताने दक्षिण आफ्रिकेला 240 धावांचे लक्ष्य दिले असून त्यांनी दिवसअखेर दोन बाद 118 धावा केल्या आहेत. ते समाधानकारक स्थितीमध्ये आहेत.

पहिल्या कसोटीत आणि दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवालचा अपवाद वगळता भारतीय फलंदाज अपेक्षित कामगिरी करु शकले नव्हते. काल शार्दुल ठाकूरच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले होते. शार्दुलने एकट्याने दक्षिण आफ्रिकेच्या सात विकेट घेतल्या होत्या.

भारतीय संघ:
केएल राहुल(कर्णधार), हनुमा विहारी, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, आर अश्विन

दक्षिण आफ्रिकेचा संघ:
डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, कीगन पीटरसन, टेंबा बावुमा, रेसी वान डर डुसें, कार्ल वेरेन, कगिसो रबाडा, मार्को जॅनसेन, लुंगी निगीडी, डुआन ओलिवर, केशव महाराज.