IND vs SL: भारत आणि श्रीलंका मालिकेपूर्वी मोठा राडा, भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचताच… काय घडलं?
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी आता श्रीलंकेत एक मोठा राडा झाल्याचे समजत आहे. आता मालिकेपूर्वी असंं घडण्यामागे कारण काय ते जाणून घ्या...

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे, या साठी भारतीय संघा श्रीलंकेला पोहोचला आहे. संघाने आधीच सराव सुरु केला आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ 7 ऑगस्टपासून एक सराव सामना खेळणार आहे. हा सामना कोलंबोच्या नॉनडिस्क्रिप्ट क्रिकेट क्लब (एनसीसी) विरुद्ध होईल. आता या सामन्यापूर्वी एक मोठा वाद निर्माण झाला आहे, खेळपट्टीवरून यापूर्वी वाद निर्माण झाला होता. सराव सामन्याच्या खेळपट्टीवर गवताचा पातळ थर असल्याने भारतीय संघ नाराज आहे, कारण त्यांच्या मते ही खेळपट्टी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी योग्य नाही. क्लबचा दावा आहे की त्यांनी श्रीलंका क्रिकेटच्या सांगण्यावरून ही खेळपट्टी तयार केली होती. भारत आणि एनसीसी यांच्यातील सराव सामना मूळ नियोजित चार दिवसांऐवजी तीन दिवसांचा असेल.
एनसीसी हा श्रीलंकेचा सर्वात जुना क्रिकेट क्लब आहे, ज्याची स्थापना 1888 मध्ये झाली. भारतीय संघ सध्या येथे सराव करत असून 7 ऑगस्टपासून एक सराव सामना खेळणार आहे. भारतीय संघाला श्रीलंकेच्या फिरकीला अनुकूल परिस्थितीसाठी योग्य खेळपट्टीची अपेक्षा होती. सराव सामन्यासाठी तयार केलेल्या खेळपट्टीवर गवत आहे, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना फायदा होईल आणि फिरकी गोलंदाजांना त्यावर प्रभावी ठरण्यास अडथळा येईल. क्लबचे म्हणणे आहे की त्यांना श्रीलंका क्रिकेटकडून गवताची खेळपट्टी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. येथे फलंदाजांना फायदा होईल आणि नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करावी.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना क्लब मॅनेजरने सांगितले की, “तिसऱ्या दिवशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. अन्यथा, ही खेळपट्टी सामन्यासाठी निर्णायक ठरेल.” भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टपासून गॉल येथे होणार आहे. येथील खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. अलीकडे भारतीय फलंदाजांना फिरकी गोलंदाजीसमोर बरीच अडचण येत आहे. मायदेशात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. 2015 पासून भारताने श्रीलंकेविरुद्ध एकही कसोटी सामना गमावलेला नाही. ही मालिका विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी निर्णायक ठरेल. त्यामुळे, भारतीय संघाला श्रीलंकेत निराश व्हायचे नाही.