IPL 2020, KXIP vs CSK : “शेन वॉटसनवर पूर्ण विश्वास होता”, विजयानंतर धोनीकडून तोंडभरून कौतुक

| Updated on: Oct 05, 2020 | 4:19 PM

सलग 4 सामन्यात अपयशी ठरलेल्या शेन वॉटसनने पंजाब विरोधात नाबाद 83 धावांची खेळी केली. (Shane Watson Complimented By Chennai Captain MS Dhoni )

IPL 2020, KXIP vs CSK : शेन वॉटसनवर पूर्ण विश्वास होता, विजयानंतर धोनीकडून तोंडभरून कौतुक
Follow us on

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 18 वा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab)विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super Kings) यांच्यात खेळला गेला. पंजाब विरुद्धच्या या सामन्यात चेन्नईला विजयाचा सुर गवसला. चेन्नईने पंजाबवर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. सलग 4 सामन्यात अपयशी ठरलेल्या शेन वॉटसनने (Shane Watson) या सामन्यात दणदणीत नाबाद 83 धावांची खेळी केली. यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. चेन्नईच्या विजयानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) शेन वॉटसनचे कौतुक केलं आहे. (Shane Watson Complimented By Chennai Captain MS Dhoni )

धोनी काय म्हणाला?

“शेन वॉटसनवर मला पूर्णपणे विश्वास होता. वॉटसन लवकरच अशी मोठी खेळी करेल, याबाबत खात्री होती. आम्ही प्रत्येक छोट्या बाबतीत सुधारणा केली. आम्हाला अशा प्रकारच्या मोठ्या विजयाची आवश्यकता होती. अशा चांगल्या विजयाने आमचा विश्वास दुणावला आहे. शेन वॉटसन नेट्समध्ये चांगली फलंदाजी करत होता. पण हीच कामगिरी मैदानात करणं गरजेचं होतं. वॉटसन सातत्याने मोठी खेळी करण्यास अपयशी ठरत होता. मात्र त्याने पंजाब विरुद्ध दमदार खेळी करत दमदार कमबॅक केलं”, असं धोनीने नमूद केलं.

सलामीच्या जोडीच्या खेळीचं कौतुक

धोनीने चेन्नईच्या फॅफ डु प्लेसिस-शेन वॉटसन या (Faf Du Plesis) सलामीच्या जोडीचं कौतुक केलं. धोनी म्हणाला “फॅफ डु प्लेसिस भन्नाट लॅप शॉट लगावतो. त्याच्या लॅप शॉटमुळे गोलंदाज गोंधळतो. या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ आहे. हे एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेतात.”

गोलंदाजांचं कौतुक

कर्णधार धोनीने फलंदाजांसह चेन्नईच्या गोलंदाजांचही कौतुक केलंय. चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली बोलिंग केली, असंही धोनीने स्पष्ट केलं. शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) 2 चेंडूत 2 विकेट्स घेत सामन्याचं चित्र पालटलं. शार्दूल ठाकूरने 18 व्या ओव्हरमध्ये पंजाबच्या दोन्ही सेट फलंदाजांना माघारी धाडलं. शार्दूलने निकोलस पूरन (Nicholas Pooran) आणि कर्णधार लोकेश राहूलला (Lokesh Rahul) बाद केलं. या दोघांना बाद केल्याने पंजाबला 187 धावांवर रोखण्यास चेन्नईला यश आले.

सामन्याचा लेखाजोखा

पंजाबने चेन्नईला विजयासाठी 179 धावांचे आव्हान दिले. चेन्नईने हे विजयी आव्हान एकही विकेट न गमवता पूर्ण केलं. चेन्नईच्या शेन वॉटसन आणि फॅफ डु प्लेसिसने 108 चेंडूत नाबाद 181 धावांची सलामी भागीदारी केली. फॅफ डु प्लेसिसने 1 सिक्स आणि 11 फोर ठोकत नॉट आऊट 87 रन्स केल्या. तर शेन वॉटसनने 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 83 धावा केल्या. वॉटसनला या खेळीसाठी “मॅन ऑफ द मॅच” पुरस्काराने गौरवण्यात आलं.

चेन्नईकडून सर्वोत्तम सलामी भागीदारी

चेन्नईकडून फॅफ आणि वॉटसनने केलेली नाबाद 181 धावांची सर्वोच्च भागीदारी ठरली. याआधी चेन्नईकडून 2011 मध्ये मायकल हसी (Michael Hussey) आणि मुरली विजय (Murli Vijay) या जोडीने 159 धावांची सलामी भागीदारी केली होती. तर त्याच वर्षी (Albie Morkel) एलबी मोर्कल -मुरली विजयने (Murli Vijay) 152 रन्सची सलामी पार्टनरशीप केली होती.

पंजाबवर दुसऱ्यांदा 10 विकेट्सने मात

चेन्नईने पंजाबला 10 विकेट्सने पराभूत करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2013 मध्ये चेन्नईने पंजाब विरुद्ध अशी कामगिरी केली होती. चेन्नईने 10 एप्रिल 2013 मध्ये ही कामगिरी केली होती. पंजाबने प्रथम बॅटिंग करत चेन्नईला विजयासाठी 139 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईने हे विजयी आव्हान एकही विकेट न गमावता 17.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. त्यावेळेस सलामीवीर मुरली विजयने नाबाद 50 तर मायकल हसीने नाबाद 86 धावा ठोकल्या होत्या.

संबंधित बातम्या :

KXIP vs CSK ​: वॉटसन आणि डू प्लेसिसने रचली IPL इतिहासातील सर्वात मोठी पार्टनरशीप

IPL 2020 : धोनीने ठोकलं शतक, ‘असा’ विक्रम करणारा दुसरा खेळाडू

(Shane Watson Complimented By Chennai Captain MS Dhoni )