
बंगळुरुच चिन्नास्वामी स्टेडियम सध्या चर्चेमध्ये आहे. यंदाच्या सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम आयपीएल चॅम्पियन बनली. चिन्नास्वामी स्टेडियम हे त्यासाठी नाही, तर बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे चर्चेत आहे. या दुर्देवी घटनेत 11 जणांना आपले प्राण गमवावे लागले. 18 वर्षानंतर पहिल्यांदाच RCB ची टीम चॅम्पियन ठरली. त्यासाठी स्टेडियमच्या आत जोरदार सेलिब्रेशन सुरु होतं. मात्र त्याचवेळी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. यात 11 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. या दुर्घटनेत एका व्यक्तीने आपला मुलगा गमावला. त्याचे अश्रूच सांगतायत, त्याच्या आयुष्यातील हे किती मोठ दु:ख आहे. आपलं सर्वस्व गमावलेला हा पिता मुलाच्या मृतदेहाच शवविच्छेदन म्हणजे पोस्टमार्टम करु नका, अशी मागणी करत आहे.
“त्याच्या बॉडीच पोस्टमार्टम करु नका. त्याचा मृतदेह मला द्या. त्याची बॉडी तुकड्यांमध्ये कापू नका” असं हा पिता सांगत होता. आपल्या एकुलत्या एक मुलाल गमावलेल्या पित्याच्या डोळ्यात अश्रू होते. “माझा एकच मुलगा होता. मी त्याला गमावलं. तो इथे मला न सांगता आला होता. आता इथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येतील. पण माझा मुलगा कोणी परत आणू शकत नाही” अशा शब्दात या पित्याने आपलं दु:ख मांडलं.
आतमध्ये सेलिब्रेशन सुरु राहिलं, बाहेर मात्र….
इंडियन प्रीमियर लीगमध्ये 18 वर्षानंतर पहिल्यांदा RCB ची टीम चॅम्पियन बनली. त्यासाठी बंगळुरुमध्ये व्हिक्टरी परेड आयोजित केली होती. विजयाच सेलिब्रेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या दरम्यान मोफत तिकिटाची अफवा पसरली. ही अफवा एका मोठ्या दुर्घटनेत बदलली. आतमध्ये सेलिब्रेशन सुरु राहिलं. बाहेर परिस्थिती बिघडत गेली. मोठ्या संख्येने लोक एकत्र जमले होते. जमावाला नियंत्रित करणं कठीण बनलेलं. जमावातील लोक आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. परिस्थिती खराब होऊन अखेर चेंगराचेंगरी झाली.
किती दिवसात रिपोर्ट येणार?
या चेंगराचेंगरी 11 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी बरेच जण जखमी सुद्धा झाले. अनेक लोक बेशुद्ध झाले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चेंगराचेंगरी कशी झाली? काय कारण ठरलं? त्याचा तपास केला जाईल. 15 दिवसात रिपोर्ट येण्याची शक्यता आहे.