Arjun Tendulkar : आईच छत्र हरपलं, हाल पहावत नाहीयत, आता अर्जुन तेंडुलकर भोलूसाठी शोधतोय घर

Arjun Tendulkar : IPL 2025 च्या यंदाच्या सीजनमध्ये अजूनपर्यंत अर्जुन तेंडुलकरला संधी मिळालेली नाही. क्रिकेट चाहते अर्जुनचा खेळ पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या दरम्यान आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून अर्जुन तेंडुलकर भोलूसाठी घर शोधतोय. भोलू आता फक्त 45 दिवसांचा आहे.

Arjun Tendulkar : आईच छत्र हरपलं, हाल पहावत नाहीयत, आता अर्जुन तेंडुलकर भोलूसाठी शोधतोय घर
Arjun Tendulkar
Image Credit source: instagram
| Updated on: Apr 15, 2025 | 9:15 AM

IPL च्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढून अर्जुन तेंडुलकर एक चांगलं काम करतोय. डोक्यावरुन आईच छत्र हरवलेल्या भोलूसाठी तो घर शोधतोय. अर्जुन तेंडुलकरने यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली आहे. डावखुऱ्या ऑलराऊंडर तेंडुलकरने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये भोलूशी संबंधित माहिती शेअर केली आहे. त्याला घर मिळवून देण्यासाठी लोकांना अपील केलय. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या या प्रयत्नांना यश येणार की नाही? ते येणारी वेळच ठरवेल. पण त्यासाठी तो जे प्रयत्न करतोय, त्यात त्याने कसलीही कमतरता ठेवलेली नाही.

भोलू आता फक्त 45 दिवसांचा आहे. एका श्वानासाठी अर्जुन तेंडुलकर हे सर्व करतोय. अर्जुनने शेअर केलेल्या माहितीनुसार, भोलू इंडी ब्रीडचा आहे. भोलूच लोकेशन ग्रँट रोड आहे. अर्जुन तेंडुलकरने भोलू पर्यंत पोहोचण्यासाठी कॉन्टॅक्ट डिटेल सुद्धा पोस्ट केली आहे. अर्जुन तेंडुलकरने दिलेल्या माहितीनुसार, भोलू एक स्ट्रीट डॉग आहे. त्याच्या आईचा मृत्यू झालाय. सध्या भोलू ज्या कुटुंबाकडे आहे, त्यांना श्वानांना पाळण्याचा अनुभव नाहीय. प्राण्यांचा कसा सांभाळ करावा, याचा त्या कुटुंबाकडे अनुभव नाहीय. त्यामुळे अर्जुनच पालकत्व कोणीतरी घ्यावं, यासाठी त्याने अपील केलय.

त्यांच्यावर तो भरपूर प्रेम करतो

अर्जुन तेंडुलकर स्वत: श्वानप्रेमी आहे. म्हणूनच त्याला भोलूच हाल पहावत नाहीयत. अर्जुन तेंडुलकरकडे स्वत:कडे पाळीव श्वान आहे. त्यांच्यावर तो भरपूर प्रेम करतो. त्यांच्यासोबत खेळतो, वेळ घालवतो. अर्जुनने आपल्या लाडक्या श्वानांसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.


अर्जुन तेंडुलकर IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. मुंबईच्या टीमने या सीजनमध्ये आतापर्यंत 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. अर्जुन तेंडुलकरला या सीजनमध्ये अजूनपर्यंत संधी मिळालेली नाही.