
Jasprit Bumrah: भारतीय क्रिकेट संघातील खेळडूंच्या खासगी आणि प्रोफोशनल आयुष्याबद्दल कायम चर्चे रंगलेली असते. आता भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे. जसप्रीत बुमराह भारतीय क्रिकेट संघासाठी फार महत्त्वाचा खेळाडू आहे. सांगायचं झालं तर, आता इंग्लंड दौऱ्यावर बुमराहच्या गोलंदाजीवर सर्वांचे लक्ष असेल. संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी त्याचा फॉर्म आणि फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. गेल्या काही वर्षांत बुमराहने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. ज्यावर प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेजेंटर आणि पत्नी संजना गणेशन हिने मोठं वक्तव्य केलं आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत संजना गणेशन हिने जसप्रीत बुमराह याच्या आयुष्या आलेल्या सकारात्मक बदलांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. संजना हिच्या मते मुलगा अंगद याच्या जन्मनंतर जरप्रीत फक्त चांगला व्यक्त म्हणून नाही तर, एक उत्तम क्रिकेटर म्हणून देखील पुढे आला आहे.
घरातील शांत वातावरण आणि कौटुंबिक सुख असल्यामुळे जसप्रीत बुमराह याची कामगिरी यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली आहे. पुढे संजना म्हणाली, ‘अंगद याच्या जन्मानंतर जसप्रीत बुमराह एक उत्तम क्रिकेटपटू झाला आहे. जेव्हा तुम्हाला परतण्यासाठी एक शांत घर असतं, जिथे तुम्ही फक्त वडील आणि पतीची भूमिका बजावू शकता, तेव्हा ते खूप मदत करतं.’
जसप्रीत बुमराह, त्याच्या वेगवान आणि अचूक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होता, त्याने नुकताच झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याची तंदुरुस्ती आणि रणनीती आणखी सुधारली आहे. गेल्या वर्षी, त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 86 विकेट्स घेतल्या. त्याच वेळी, त्याने भारतासाठी टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद देखील जिंकलं.
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. संजना आणि जसप्रीत यांनी 2021 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर 2023 मध्ये संजय हिने मुलगा अंगद याला जन्म दिला. अंगद अनेकदा त्याच्या वडिलांना पाठिंबा देण्यासाठी त्याची आई संजना गणेशनसोबत स्टेडियममध्ये दिसतो.