kapil Dev : कपिल देव आणि धोनी एकत्र दिसले, रणवीर सिंगने मजेशीर कमेंटमुळे चाहत्यांना हसू आवरेना

कपीलदेव आणि महेंद्रसिंग धोनी हे दोन्ही माजी कर्णधार असे आहेत की, त्यांनी टीम इंडियाला विश्वचषक जिंकून दिला आहे.

kapil Dev : कपिल देव आणि धोनी एकत्र दिसले, रणवीर सिंगने मजेशीर कमेंटमुळे चाहत्यांना हसू आवरेना
kapil dev dhoni
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 01, 2022 | 9:33 AM

क्रिकेट खेळाडूंचे (Cricket Player) सोशल मीडियावर (Social Media) अधिक फॅन आहेत. त्यांच्या कामगिरीनुसार त्यांची चर्चा होते. काल अचानक कपिल देव (kapil Dev) आणि धोनी एकत्र दिसल्याने त्यांची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. ते दोघंही एका गोफ्टच्या मैदानात आहेत. त्याचबरोबर दोघांची कपडे सुद्धा एकसारखी असल्याने त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

विशेष म्हणजे कपील देव यांनी त्यांच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरती दोघांचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला लाखोंच्या संख्येने लाईक आल्या आहेत. तर कमेंट सुध्दा आल्या आल्या आहेत.

कपीलदेव आणि महेंद्रसिंग धोनी हे दोन्ही माजी कर्णधार असे आहेत की, त्यांनी टीम इंडियाला विश्वचषक जिंकून दिला आहे. त्यामुळे दोघांची आजही सोशल मीडियावर चर्चा असते.

कपील देवने ज्यावेळी फोटो शेअर केला आहे, त्यावेळी सोशल मीडियावर “जेव्हा क्रिकेटर गोल्फर होतात” असा आशय लिहिला आहे.

त्यावर रणवीर कपूरने वाह लिहून प्रेमाचं एक सिम्बॉल कमेंट केलं आहे. अनेकांनी रणवीर कपूरला उत्तर दिलं आहे.