VIDEO : 6,6,6,6,6,2,6, दे घुमाके, 23 वर्षाच्या बॅट्समनची कमाल, कोण आहे हा युवा फलंदाज?

भारतात क्रिकेटमध्ये खूप टॅलेंट आहे असं नेहमी म्हटलं जातं, ते तुम्ही अनेकदा ऐकलं सुद्धा असेल. पण आता स्थानिक पातळीवर होणाऱ्या टुर्नामेंटमुळे असं टॅलेंट समोर येतय. T20 क्रिकेटची सुरुवात झाल्यापासून तर अनेक चांगले-चांगले खेळाडू तयार झाले. आता अशाच एका स्पर्धेत एका युवा फलंदाजने थक्क करुन सोडणारी बॅटिंग केली. एकदा हा व्हिडिओ बघा.

VIDEO : 6,6,6,6,6,2,6, दे घुमाके, 23 वर्षाच्या बॅट्समनची कमाल, कोण आहे हा युवा फलंदाज?
lochan gowda
Image Credit source: KSCA
| Updated on: Aug 23, 2025 | 9:59 AM

इंडियन प्रीमियर लीगचा नवीन सीजन सुरु होण्यासाठी अजून 9 ते 10 महिन्यांचा काळ बाकी आहे. त्याआधी ऑक्शन होईल. त्या ऑक्शनआधी काही देशातंर्गत क्रिकेटपटू आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेत आहेत. सध्या देशात राज्य पातळीवर T20 लीगचे सामने सुरु आहेत. युवा प्रतिभेला स्वत:च टॅलेंट दाखवण्यासाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. अशाच एका लीगनमध्ये 23 वर्षाच्या युवा फलंदाजाने आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली. क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रतिस्पर्धी टीमची वाट लागली. कर्नाटक येथे महाराजा टी20 ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. युवा ओपनर लोचन गौडाने स्फोटक फलंदाजी केली. एकाच ओव्हरमध्ये त्याने सिक्सचा पाऊस पाडत 32 धावा लुटल्या.

मैसूरमध्ये शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी महाराजा ट्रॉफीचा 24 वा सामना झाला. यात शिवमोगा लायंस आणि मंगलोर ड्रॅगन्सच्या टीम आमने-सामने होत्या. ड्रॅगन्सच्या टीमने पहिली फलंदाजी केली. त्यांच्या टीमने 20 ओव्हरमध्ये 200 धावांचा डोंगर उभा केला. टीमला या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावली ती 23 वर्षाचा युवा ओपनर लोचनने. त्याने टीमसाठी सर्वात जास्त धावा केल्या. लोचन या मॅचमध्ये 32 चेंडूत 63 धावांची स्फोटक इनिंग खेळला.

अशोकची गोलंदाजी फोडून काढली

लोचनच्या या इनिंगमध्ये सर्वात जास्त आक्रमकता आणि आकर्षक क्षण पहायला मिळाला 11 व्या ओव्हरमध्ये. त्याने लायन्सचा गोलंदाज डी अशोकची गोलंदाजी फोडून काढली. लोचनने या ओव्हरची सुरुवातच सिक्सने केली. त्याने सलग 4 सिक्स मारल्या. पाचव्या चेंडूवर फक्त 2 धावा काढल्या. पण ओव्हरचा शेवट त्याने सिक्सने केला. लोचनने या ओव्हरमध्ये 5 सिक्स मारुन 32 धावा लुटल्या. लोचनने इनिंगमध्ये एकूण 63 धावा केल्या. या निम्म्या 32 धावा एकाच ओव्हरमध्ये कुटल्या. त्याने आपल्या इनिंगमध्ये 5 सिक्स आणि दोन फोर मारले. पाच सिक्स एकाच ओव्हरमध्ये मारल्या.


शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 6 धावा हव्या होत्या, पण…

लोचनच्या या इनिंगनंतर आणखी एका फलंदाजाने स्फोटक बॅटिंग केली. यावेळी शिवमोगा लायन्सच्या ओपनरने हल्ला केला. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लायन्सचा ओपनर तुषार सिंहने दमदार सुरुवात करुन दिली. त्याने 48 चेंडूत 89 धावा कुटल्या. त्याच्या इनिंगमध्ये 7 सिक्स आणि 6 फोरचा समावेश आहे. त्याशिवाय हार्दिक राजने 14 चेंडूत 32 धावा करुन टीमला विजयाच्याजवळ पोहोचवलेलं. शेवटच्या चेंडूवर लायन्सला विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती. पण तो चेंडू निर्धाव गेला. अशा प्रकारे मंगलोर ड्रॅगन्सची टीम 5 रन्सनी विजयी ठरली.