AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाची झोप उडवणारा अमेरिका या देशाकडून खरेदी करतो क्षेपणास्त्रे, अहवालातून मोठा खुलासा

USA Weapons : जगातील 99 देशांना शस्त्रे विकणारा अमेरिका स्वतः दुसऱ्या एका देशाकडून शस्त्रे खरेदी करत आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनलच्या अलीकडील अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे.

जगाची झोप उडवणारा अमेरिका या देशाकडून खरेदी करतो क्षेपणास्त्रे, अहवालातून मोठा खुलासा
US MissileImage Credit source: Google
| Updated on: Mar 10, 2026 | 10:05 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. अमेरिकेकडून वेगवेगळ्या शस्त्रांकडून इराणवर हल्ले केले जात आहेत. अशातच आता अमेरिकेच्या शस्त्राबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जगातील 99 देशांना शस्त्रे विकणारा अमेरिका स्वतः नॉर्वेकडून सर्वाधिक शस्त्रे खरेदी करत आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनलच्या अलीकडील अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. 2021 ते 2025 या कालावधीत नॉर्वेने निर्यात केलेल्या शस्त्रांपैकी सुमारे 33% शस्त्रे अमेरिकेने खरेदी केली आहेत. नॉर्वे हा असा एकमेव देश आहे ज्याच्याकडून अमेरिका सर्वाधिक शस्त्रे घेतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली आर्मी असलेला देश आहे. अमेरिकेशिवाय नॉर्वे हा देश युक्रेन आणि रोमानिया या देशांनाही शस्त्रे विकतो. नॉर्वे हा रशियाचा शेजारी देश असून तो नाटो (NATO)चा सदस्य देखील आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनलच्या अहवालानुसार जागतिक शस्त्रविक्रीत नॉर्वेचा वाटा वाढताना दिसत आहे. जगभरात जर 100 शस्त्रे विकली गेली तर त्यापैकी एक शस्त्र नॉर्वेचे असते. तसेच नॉर्वेने जर 100 शस्त्रे विकली तर त्यापैकी 33 शस्त्रे अमेरिका खरेदी करते.

नॉर्वे शस्त्रे बनवतो का?

नॉर्वे हा देश मिसाइल आणि रडार सिस्टिमसारखी अत्याधुनिक शस्त्रे तयार करतो. नॉर्वेमध्ये शस्त्रनिर्मितीचे काम Kongsberg सारख्या कंपन्या करतात. ZipDo च्या माहितीनुसार नॉर्वेच्या अर्थव्यवस्थेत संरक्षण उत्पादनाचा वाटा सुमारे 8% आहे. अलीकडच्या वर्षांत नॉर्वेच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. 2022 मध्ये नॉर्वेने सुमारे 11.9 अब्ज NOK (नॉर्वेजियन क्रोन) किमतीची शस्त्रे विकली होती. 2024 मध्ये ही रक्कम वाढून 16.4 अब्ज NOK झाली आहे. मजबूत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे नॉर्वेच्या शस्त्रांना मोठी मागणी आहे. मात्र नॉर्वे प्रामुख्याने अमेरिका आणि त्याच्या मित्रदेशांनाच शस्त्रे विकतो.

अमेरिका नॉर्वेकडून कोणती शस्त्रे खरेदी करतो ?

अमेरिका नॉर्वेकडून प्रामुख्याने दोन प्रकारच्या मिसाइल प्रणाली खरेदी करतो. पहिली म्हणजे नेव्हल स्ट्राइक मिसाइल (NSM) आणि दुसरी म्हणजे नॅशनल अॅडव्हान्स्ड सरफेस टू एअर मिसाइल सिस्टम (NASAMS). NASAMS प्रणाली व्हाइट हाऊस आणि वॉशिंग्टन D.Cच्या सुरक्षेसाठीही तैनात करण्यात आली आहे. ही अत्यंत प्रभावी आणि धोकादायक हवाई संरक्षण प्रणाली मानली जाते. तर NSM चा वापर अमेरिकन नौदल करते. समुद्रातील कारवाईत ही मिसाइल प्रणाली खूप प्रभावी मानली जाते. 2024 मध्ये अमेरिकेने नॉर्वेची कंपनी Kongsberg सोबत 904 दशलक्ष डॉलरचा करार केला होता.

नेव्हल स्ट्राइक मिसाइल किती शक्तिशाली?

नेव्हल स्ट्राइक मिसाइल (NSM) ही जगातील सर्वात आधुनिक स्टेल्थ अँटी-शिप आणि लँड-अटॅक मिसाइल पैकी एक मानली जाते. याची रेंज सुमारे 185 ते 200 किमी आहे. एकदा डागल्यानंतर ही मिसाइल स्वतः लक्ष्य शोधून त्यावर हल्ला करू शकते. तर NASAMS ही ग्राउंड-बेस्ड एअर डिफेन्स प्रणाली आहे. मध्यम अंतरावरून येणारे लढाऊ विमान, हेलिकॉप्टर आणि क्रूझ मिसाइल सहजपणे नष्ट करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. त्यामुळे ही शस्त्रे अमेरिका नॉर्वेकडून खरेदी करते.

Follow Us
तुमची दाढी अजून जळतेय...; शिंदेंच्या टीकेला राऊतांचा जोरदार पलटवार
Sanjay Raut UNCUT | तुमची दाढी अजून जळतेय...मिस्टर मिंदे...; शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचा जोरदार पलटवार
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'त्या' फोटोची तुफान चर्चा
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट केला मोठा दावा...
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट नाव घेत केला मोठा दावा, काय घडलं?
NEET, नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा!
NEET, TET नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा!
रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
ब्रेकिंग! रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
Task Force | परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!