IND vs NZ : फक्त एका मॅचमध्ये संधी, त्यात फ्लॉप ठरताच कुलदीप यादव टेस्ट टीममधून OUT त्याच्याजागी वनडे गाजवणाऱ्या खेळाडूची एन्ट्री
IND vs NZ Test Squad : सध्या टीम इंडिया वनडे सीरीज खेळत आहे. आता शेवटचा वनडे सामना बाकी आहे. त्यानंतर दोन टेस्ट मॅचची सीरीज होईल. या कसोटी मालिकेआधी टीम इंडियात महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.

Team India Test Squad vs New Zealand : न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरीज आधी सिलेक्शन कमिटीने भारताच्या कसोटी संघात दोन महत्वाचे बदल केले आहेत. 19 नोव्हेंबर 2026 पासून वेलिंग्टनमध्ये टेस्ट सीरीज सुरु होणार आहे. दोन मॅचच्या या टेस्ट सीरीजसाठी युवा वेगवान गोलंदाज गुरनूर बराडचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. चायनामन स्पिनर कुलदीप यादवला टेस्ट स्क्वॉडमधून रिलीज करण्यात आलं आहे. म्हणजे त्याला संघाबाहेर करण्यात आलं आहे. मायदेशात येऊन कुलदीप यादव रणजी मध्ये खेळू शकतो. भारतीय संघासाठी दुसरी चांगली बाब म्हणजे स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत वेलिंग्टनमध्ये पोहोचला असून टेस्ट संघात सामील झाला आहे.
गुरनूर बराडचा कसोटी संघात समावेश करण्यात आल्यामुळे तो आता न्यूझीलंड विरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या वनडेसाठी उपलब्ध नसेल. बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीने बराडच्या जागी दुसऱ्या कुठल्याही रिप्लेसमेंट प्लेयरची घोषणा केलेली नाही. गुरनूर बराडसाठी न्यूझीलंड दौरा खूप खास ठरला आहे. त्याने 3 वनडे सामन्यात 9 विकेट घेतले आहेत. वनडे सीरीजमध्ये तो सध्या सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज आहे.
त्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला
कुलदीप यादवला वनडे सीरीजमध्ये फक्त एका सामन्या खेळण्याची संधी मिळाली होती. त्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. बे ओवलवर झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात कुलदीप यादवचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला. या मॅचमध्ये त्याने 8 ओव्हरमध्ये 73 रन्स दिले. पण एकही विकेट काढला नाही.
भारताचा अपडेटेड टेस्ट स्क्वॉड
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, गुरनूर बराड.
भारताचा अपडेटेड वनडे स्क्वॉड
श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर/ उपकर्णधार), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, ऋतुराज गायकवाड़, अर्शदीप सिंह, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, यश ठाकुर, कुलदीप यादव.