AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shruti Haasan: हातात मीठ घेतलं, तिचे तुकडे केले अन्..; श्रुती हासनच्या मुंबईतील घरात घडला भयानक प्रकार

Shruti Haasan: अभिनेत्री श्रुती हासनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला. मुंबईतील घरात तिला खूप विचित्र अनुभव आला होता. घाबरून तिने हनुमान चालीसाच लावली होती.

Shruti Haasan: हातात मीठ घेतलं, तिचे तुकडे केले अन्..; श्रुती हासनच्या मुंबईतील घरात घडला भयानक प्रकार
Shruti HaasanImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 14, 2026 | 11:22 AM
Share

Shruti Haasan: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती हासन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कमल हासन यांची मुलगी असलेल्या श्रुतीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुंबईतील तिच्या घरात घडलेल्या विचित्र अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. तिच्या घरात असलेली एक मानवी आकाराची बाहुली (Mannequin) अचानक स्वतःहून जागा बदलायची. या प्रकारामुळे श्रुती इतकी घाबरली की तिने चक्क हनुमान चालीसा लावली आणि घरातील त्या बाहुलीचे तुकडे करून ती बाहेर काढली. श्रुतीने या बाहुलीचं नाव ‘फिओना’ ठेवलं होतं. तिच्या या खुलाशामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं काय घडलं होतं श्रुतीच्या घरात?

नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या ‘डबल डेट’ या यूट्यूब शोमध्ये श्रुतीने हा अनुभव सांगितला. काही ठिकाणी असलेली विचित्र ऊर्जा तिला जाणवते, असा खुलासा श्रुतीने या मुलाखतीत केला. प्रत्येक वेळी असं होतं असं नाही, पण काही विशिष्ट ठिकाणी मला वेगळाच अनुभव येतो. चेन्नईमधील माझ्या घरात मला अतिशय शांत आणि सकारात्मक वातावरण जाणवतं. मात्र, मुंबईतील घरात काहीतरी संशयास्पद असल्याची भावना मला सतत येत होती, असं ती म्हणाली.

श्रुतीच्या घरात एक मानवी आकाराची बाहुली होती. तिच्याकडे असलेला एक अतिरिक्त ड्रेस कपाटात मावत नव्हता. त्यामुळे तिने तो ड्रेस या बाहुलीला घातला होता. तिने या बाहुलीचं नाव फिओना ठेवलं होतं. तिचे मित्रमैत्रिणी घरी आल्यावर या बाहुलीला पाहून गंमतीने हाय म्हणायचे. मात्र, काही दिवसांनी या बाहुलीची जागा बदलत असल्याचं श्रुतीच्या लक्षात आलं.

या विचित्र प्रकारामुळे श्रुती प्रचंड अस्वस्थ झाली होती. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आय अॅम लिजेंड’ या चित्रपटातील बाहुल्यांची आठवण तिला झाली. अखेर तिने ती बाहुलीच काढून टाकण्याचा निर्णय घेतला. श्रुतीने सांगितलं की, तिने हनुमान चालीसा लावली, हातात मीठ घेतलं आणि त्या बाहुलीचे तुकडे केले. त्यानंतर तिने संपूर्ण घर बंद करून ठेवलं. आता मात्र तिचं घर शांत असल्याचंही तिने सांगितलं.

नास्तिक कुटुंबात वाढली, पण स्वतः धार्मिक

याच मुलाखतीत श्रुतीने आपल्या धार्मिक विचारांबद्दलही सांगितलं. कमल हासन यांच्या कुटुंबात धार्मिक वातावरण नव्हतं. आपण नास्तिक आणि धर्मापासून दूर असलेल्या वातावरणात वाढलो, असं तिने सांगितलं. मात्र, कुटुंबात स्वतः एकटीच धार्मिक असल्याचंही ती म्हणाली. विशेष म्हणजे, तिला ‘विक्का’ (Wicca) या आधुनिक आध्यात्मिक परंपरेमध्येही रस आहे. निसर्ग, स्त्री पूर्वजांचा वारसा आणि प्राचीन परंपरांविषयी जाणून घेण्याची तिला आवड आहे.

Follow Us
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून शिंदेंचा
Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
Jensen Huang : CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
जळगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16..
Jalgaon : जळगाव जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16 वाजता जमीन थरथरली; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
Pune : पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम चित्रपटाच्या शूटिंगवरून नवा वाद
करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली
Karuna Munde : करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली भेट; चर्चांना उधाण
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं?
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं? मुंबई महापालिकेतील बैठकीवरून नवा राजकीय वाद
राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान...
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
NCP : दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
Pune-Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि प्रवासी जखमी; वाहतुकीचा खोळंबा