Maharashtra Kesari 2023 : ‘रक्ताचं पाणी करुन त्यांनी मला….’, Shivraj Rakshe ने उलगडला त्याचा संघर्ष

Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षेने अलीकडेच एका सन्मान कार्यक्रमात कुस्तीचा वारसा कोणाकडून लाभला? यामागे किती वर्षापासूनची त्याची मेहनत आहे? भविष्यातील त्याच्या योजना काय आहेत? या बद्दल माहिती दिली.

Maharashtra Kesari 2023 : 'रक्ताचं पाणी करुन त्यांनी मला....', Shivraj Rakshe ने उलगडला त्याचा संघर्ष
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 3:47 PM

मुंबई – यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात पार पडली. भव्य-दिव्य पद्धतीने पार पडलेल्या या स्पर्धेत शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. अंतिम फेरीत त्याने महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवलं. महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणं ही साधीसुधी गोष्ट नाहीय. त्यासाठी प्रचंड परिश्रम, मेहनत लागते. शिवराज राक्षेने अथक मेहनतीने हे यश कमावलं. शिवराज राक्षेने अलीकडेच एका सन्मान कार्यक्रमात कुस्तीचा वारसा कोणाकडून लाभला? यामागे किती वर्षापासूनची त्याची मेहनत आहे? भविष्यातील त्याच्या योजना काय आहेत? या बद्दल माहिती दिली.

शिवराज राक्षेचे पहिले गुरु कोण?

“कुस्तीक्षेत्रात पैलवानीचा वारसा मला आजोबांपासून लाभलाय. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने वडिलांनी, माझ्यामध्ये महाराष्ट्र केसरीच स्वप्न पाहिलं. त्यांनी अहोरात्र, कष्ट करुन रक्ताच पाणी करुन मला घडवलं. त्यामुळे आई-वडिल माझे पहिले गुरु आहेत” असं शिवराज राक्षेने सांगितलं.

तरुण पिढीला काय सल्ला दिला?

“आजच्या तरुण पिढीने खचून जाऊ नये. त्यांनी प्रयत्न करत राहिले पाहिजेत. एकदिवस यश नक्की मिळेल. यश एकरात्रीत मिळत नाही. मी 14 वर्ष तपश्चर्या केली. सहजासहजी काहीही मिळत नाही. देवाला पण, प्रभु रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. पयत्न करा, खचून जाऊन नका, यश तुमचच असणार आहे” असं शिवराज राक्षे म्हणाले. शिवराज राक्षेचा भविष्याचा प्लान काय?

“महराष्ट्र केसरी झाल्यापासून माझे अनेक सत्कार समारंभ झाले. कौतुकाचा वर्षाव झाला. जिल्ह्यात होणारा हा माझा पहिला सन्मान असला, तरी शेवटचा नक्कीच नाही. येणाऱ्या काळात ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठी प्रयत्न चालू राहतील. शेवटपर्यंत तुमच प्रेम असंच राहू द्या” असं शिवराज राक्षेने सांगितलं.

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.