IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीचं कौतुक

ज्यावेळी ऑस्ट्रेलिया दुसरी इनिंग खेळत होता. त्यावेळी टीम इंडियाला अधिक विकेटची गरज होती.

IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीचं कौतुक
Team india
Image Credit source: BCCI
| Updated on: Sep 22, 2022 | 11:20 AM

आशिया चषकात (Asia Cup 2022) टीम इंडियाचा पराभव झाल्यापासून गोलंदाजांवरती अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कारण टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांनी आशिया चषकात महत्त्वाच्या सामन्यात अत्यंत खराब कामगिरी केली. सोशल मीडियावर (Social Media) सुद्धा अनेक खेळाडूंवरती चाहत्यांनी जोरदार टीका केली. टीम इंडियाचं कॅप्टन पद आणि गोलंदाज यांच्यावरती मागच्या काही दिवसांपासून वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

ज्यावेळी ऑस्ट्रेलिया दुसरी इनिंग खेळत होता. त्यावेळी टीम इंडियाला अधिक विकेटची गरज होती. त्याचवेळी टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याच्या गोलंदाजी करीत असताना कॅमेरून ग्रीनच्या पॅडवर चेंडू आदळला होता. परंतु अपील केली नाही. त्याचे परिणाम पुढे टीम इंडियाला पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी सुद्धा टीका केली आहे. कारण सध्या खेळाडू अपील सुद्धा करीत नाहीत, म्हणजे नेमकं कोणता खेळ खेळत आहेत हेचं कळेना अशी टीका केली आहे.

धोनी सगळ्यात यशस्वी कर्णधार होता. कारण त्याने विकेट किपिंग करीत असताना अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या झालेल्या पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची चांगली धुलाई झाल्याची पाहायला मिळाली असंही शास्त्री म्हणाले.

टीम इंडियाची दुसरी मॅच उद्या नागपूरमध्ये होणार आहे. त्यावेळी टीम इंडिया विजयी होणार का ? हे पहावे लागले.