Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना पाहण्यासाठी बर्थडे बॉय महेंद्रसिंग धोनी स्टेडियममध्ये उपस्थित होता. धोनीची एक रिअ‍ॅक्शन फार व्हायरल झाली.

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, वंडर बॉयने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral
dhoni reaction on vaibhav sooryavanshi
| Updated on: Jul 08, 2026 | 10:00 AM

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना काल पार पडला जो भारतीय संघाने अतिशय निराशाजनक पद्धतीने गमावला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला आतापर्यंत एकही टी-20  सामना जिंकता आलेला नाही, भारतीय संघ अजूनही अडचणींचा सामना करत आहे. भारतीय संघ आता मालिका बचावण्यासाठी खेळण्याचा प्रयत्न करेल. कालचा सामना भारतीय संघाने तब्बल 125 धावांनी गमावला. या सामन्यात फक्त एका गोष्टीने चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटले आणि ती म्हणजे महेंद्र सिंग धोनीची उपस्थितीती. कालचा सामना पाहण्यासाठी धोनी मैदानात आला होता. धोनीच्या एका रिअ‍ॅक्शनची प्रचंड चर्चा झाली.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोमवारी, 7 जुलै रोजी 45 वर्षांचा झाला. आपल्या वाढदिवसानिमित्त, त्याने ट्रेंट ब्रिज येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात उपस्थित राहून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. पॉवरप्लेनंतर लगेचच, जेव्हा प्रसारकाच्या कॅमेऱ्याने गेस्ट बॉक्सकडे लक्ष वळवले, तेव्हा वाढदिवसाचा मानकरी एमएस धोनी तिथे उभा असलेला दिसला. हातात कॉफीचा कप घेऊन, धोनी इतर प्रतिनिधी आणि भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफच्या सदस्यांसोबत गप्पा मारण्याचा आनंद घेत होता.

वाढदिवसाच्या दिवशी धोनी टीम इंडियाला चिअर करण्यासाठी आला होता हा क्षण चाहत्यांसाठी पर्वणीच ठरला. पण या सामन्यात तो वैभव सूर्यवंशीच्या खेळीवर फिदा झालेला पाहायला मिळाला. वैभवचे चाहते जगभर आहेत पण जेव्हा दिग्गज महेंद्रसिंगला त्याच्या खेळीचे अप्रुप वाटते तेव्हा मात्र आणखी काय हवं असते. या सामन्यात असाच एक क्षण पाहायला मिळाला जेव्हा वैभव सूर्यवंशीने दुसऱ्याच चेंडूवर षटकार मारला. वैभवने षटकार मारणे हे काही नवीन नाही पण तिथे स्टेडियममध्ये बसलेल्या धोनीची त्यावरची रिअ‍ॅक्शन ही चाहत्यांसाठी मोलाची ठरली. वैभवने एक जोरात षटकार मारला चाहते नेहमीप्रमाणे आनंदाने कल्लोळ करत होते पण तिथे स्टेडियममध्ये बसलेला धोनीही त्याचा षटकार पाहून टाळ्या वाजवू लागला. याचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे।

बीसीसीआय, त्याचे माजी सहकारी आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी शुभेच्छा पाठवल्या, परंतु फिफा विश्वचषकाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सनी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. फिफानेही धोनीला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अनेक वर्षांनंतरही धोनीची लोकप्रियता आणि चाहता वर्ग अढळ आहे. आयसीसीच्या तिन्ही प्रमुख व्हाईट-बॉल ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव भारतीय कर्णधार आहे.

Follow Us