AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi : इंग्लंडचा मोठा क्रिकेटर फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीचा खेळ पाहून भारावला, त्याने लिहिलं की…

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने आज आपल्या बॅटिंगने कमाल केली. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना फायनलमध्ये जे शक्य होत नाही, ते वैभवने इतक्या लहान वयात करुन दाखवलं. वैभवचा खेळ अद्वितीय होता. इंग्लंडच्या एका मोठ्या क्रिकेटपटूलाही वैभवची इनिंग पाहून रहावलं नाही.

Vaibhav Suryavanshi :  इंग्लंडचा मोठा क्रिकेटर फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीचा खेळ पाहून भारावला, त्याने लिहिलं की...
Vaibhav Suryavanshi Image Credit source: x
| Updated on: Feb 06, 2026 | 6:59 PM
Share

भारताच्या वैभव सूर्यवंशीने आज क्रिकेट विश्वाला जिंकलं. अंडर 19 वर्ल्ड कपच्या इतिहासातील आज दुसरं वेगवान शतक वैभव सूर्यवंशीने झळकावलं. महत्वाचं म्हणजे वर्ल्ड कप फायनलच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. अवघ्या 55 चेंडूत वैभवने शतकाला गवसणी घातली. 80 चेंडूत 175 धावांची वादळी खेळी करुन वैभव आऊट झाला. वैभवच्या झंझावातापुढे इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरक्ष: पालापाचोळा झाला. वैभव सूर्यवंशी इंग्लिश गोलंदाजांवर तुटून पडला. त्यांचा कर्दनकाळ बनला. त्याने आपल्या दमदार इनिंगमध्ये 15 फोर आणि 15 सिक्स मारले. वैभव सूर्यवंशीच्या या खेळीने भारतीय चाहते सुखावले. वैभवने आपल्या बॅटिंगने डोळ्याचं पारणं फेडलं. वैभव सूर्यवंशी तडफदार, आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जातो. आजच्या सामन्यातही तो तसाच खेळला.

वैभव सूर्यवंशीचा फायनलमधील हा खेळ पाहून इंग्लंडचा महान फलंदाज मायकल वॉनला सुद्धा रहावलं नाही. त्याने सुद्धा वैभवच्या इनिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. मायकल वॉनने एक्सवर पोस्ट केलीय. ‘वैभव सूर्यवंशी…ही इनिंग खूप, खूप खास…’ अशा शब्दात त्याने कौतुक केलय. एरवी मायकल वॉन हा भारतावर टीका करण्यासाठी ओळखला जातो. त्याची आणि भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांची एक्सवरील जुगलबंदी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. भारताच्या पराभवानंतर मायकल वॉन हा जिव्हारी लागेल असं बोलतो. पण आज त्याने मनापासून वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलय.

वैभव सूर्यवंशी आऊट कसा झाला?

वनडे क्रिकेटमध्ये आयसीसीच्या फायनलमधील वैभव सूर्यवंशीचं हे आतापर्यंतचं वेगवान शतक आहे. मॅनी लमसडेनच्या 26 व्या ओव्हरमध्ये लॅप शॉट मारताना वैभव सूर्यवंशी बाद झाला. त्याने सोपा झेल दिला. पण त्याआधी वैभवने अनेक विक्रम केले. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक सिक्स मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडलाय. आपल्या पहिल्याचा वर्ल्ड कपमध्ये त्याने ही कमाल केलीय. वैभव सूर्यवंशीने सेमीफायनल नंतर फायनलमध्ये सुद्धा अर्धशतक फटकावलं. त्याने अवघ्या 32 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अंडर 19 वर्ल्ड कप 2026 मधील त्याचं हे चौथं अर्धशतक आहे.वैभव सूर्यवंशी याने आयपीएलनंतर अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही ऐतिहासिक कामगिरी केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...