
IPL 2025 मध्ये बुधवारी 2 एप्रिलला RCB आणि गुजरात टायटन्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये गुजरात टायटन्सने RCB ला हरवलं. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने 8 विकेटने विजय मिळवला. मोहम्मद सिराज गुजरातच्या या विजयाचा नायक ठरला. त्याने 3 विकेट काढले. विजयाचा हिरो ठरलेला मोहम्मद सिराज या मॅचमध्ये इमोशनलही झाला होता. एकवेळ असं वाटलं की, त्याच्या डोळ्यातून अश्रू येतील. मोहम्मस सिराजसमोर विराट कोहली स्ट्राइकवर असताना हे घडलं.
RCB विरुद्ध गुजरात टायटन्सने पहिली गोलंदाजी केली. मोहम्मद सिराज पहिली ओव्हर टाकण्यासाठी आला. RCB कडून फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने फलंदाजी सुरु केली. सिराजने पहिला चेंडू सॉल्टला टाकला. त्यावर त्याने एक धाव घेतली. त्यानंतर सिराज दुसरा चेंडू टाकण्यासाठी धावला. समोर विराट कोहली होता. सिराजने चेंडू टाकण्यासाठी रन-अप घेतला होता. पण मध्येच तो थांबला. सिराज इमोशनल झाल्याच चेहऱ्यावरुन दिसत होतं. असं वाटलं की, तो आता रडेल.
सिराज आणि विराटमध्ये मैदानावर जे घडलं, ते गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिलच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसून आलं. गिलच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि सिराज आणि विराटमधला तो क्षण यातून सगळं काही कळून येतं.
तो का इमोशनल झालेला?
मॅच संपल्यानंतर सिराजला या बद्दल विचारण्यात आलं. त्याला विचारण्यात आलं की, तो का इमोशनल झालेला?. त्यावर त्याने उत्तर दिलं की, हो, मी भावूक झालेलो, कारण RCB सोबत 7 वर्षाचा बॉन्ड होता. विराट कोहली त्याचा आदर्श होता. त्याशिवाय थोडा नर्वसनेस सुद्धा होता. सिराजने मॅचच्या सुरुवीताला फिल सॉल्ट आणि देवदत्त पडिक्कल यांची विकेट काढून RCB चा खेळ बिघडवला. त्यानंतर खतरनाक दिसणाऱ्या लिविंगस्टनच्या अर्धशतकीय इनिंगला विराम लावला. त्याने गुजरात टायटन्सच्या विजयाचा पाया रचला.