MI vs KKR : मुंबई इंडियन्सच्या विजयात रोहित शर्माचं महत्वाचं योगदान, पण त्याच्याकडून झाली एक मोठी चूक

MI vs KKR : मुंबई इंडियन्सने काल सलामीच्या सामन्यात विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हा सामना होता. सलग 13 सीजन मुंबईच्या टीमला जे जमत नव्हतं, ते मुंबई इंडियन्सने करुन दाखवलं. या विजयात रोहित शर्माचं महत्वाचं योगदान आहेच. पण या मॅचमध्ये त्याने एक मोठी चुकही केली.

MI vs KKR : मुंबई इंडियन्सच्या विजयात रोहित शर्माचं महत्वाचं योगदान, पण त्याच्याकडून झाली एक मोठी चूक
Rohit Sharma-Hardik Pandya
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 30, 2026 | 8:55 AM

IPL 2026 Rohit Sharma : मुंबई इंडियन्सने काल तब्बल 13 वर्षानंतर इतिहास बदलला. सीजनच्या सलामीच्या सामन्यात विजयाची नोंद केली. याआधी सलग 13 सीजन मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यात पराभव झाला होता. मुंबई इंडियन्सच्या या विजयात माजी कर्णधार रोहित शर्माने महत्वाचं योगदान दिलं. मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होता. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 220 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने 20 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विजय मिळवला. मुंबईने 6 विकेट आणि पाच चेंडू राखून विजय मिळवला. मागचे 13 सीजन मुंबई इंडियन्सचा सतत पहिल्या सामन्यात पराभव झाला आहे. यावेळी मुंबई इंडियन्सचे सलामीवीर रायन रिकेलटॉन आणि रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी केली. विजयाचा मजबूत पाया रचला.

रायन रिकेलटॉनने 43 चेंडूत 81 आणि रोहित शर्माने 38 चेंडूत 78 धावा फटकावल्या. रोहितने त्याच्या आक्रमक खेळीत 6 चौकार आणि 6 षटकार लगावले. मुंबई इंडियन्सच्या विजयात रोहित शर्माची महत्वाची भूमिका आहेच. पण त्याने केलेली एक चूक मुंबई इंडियन्सला चांगलीच महाग पडली. केकेआरची इनिंग सुरु असताना 15 व्या ओव्हरमध्ये झालेल्या चुकीची मुंबई इंडियन्सला मोठी किंमत चुकवावी लागली. अल्लाह गजनफरच्या चेंडूवर अंगकृष रघुवंशीने लॉन्ग ऑनला शॉट मारला. त्यावेळी रोहित शर्माने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. पण हा झेल सुटला व चौकार गेला. त्यावेळी अंगकृष रघुवंशी फक्त 21 रन्सवर खेळत होता. रोहित शर्माने या सोडलेल्या झेलची मुंबई इंडियन्सला मोठी किंमत चुकवावी लागली.

संधीचा पुरेपूर फायदा उचलला

कॅच सुटल्यानंतर मिळालेल्या संधीचा अंगकृष रघुवंशीने पुरेपूर फायदा उचलला. त्याने आपली इनिंग पुढे नेताना 51 धावा केल्या. कॅच सुटल्यानंतर त्याने अजून 30 धावा केल्या. या ड्रॉप कॅचमुळे केकेआरचा धावा बनवण्याचा वेग अजून वाढला. धावसंख्या 220 पर्यंत पोहोचली. अंगकृष रघुवंशीने त्याच्या इनिंगमध्ये 175.86 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. यात 6 चौकार आणि 2 षटकार होते.

दोन महत्वाच्या भागीदाऱ्या केल्या

अंगकृष रघुवंशीने त्याच्या या इनिंगमध्ये अजिंक्य रहाणे आणि रिंकू सिंहसोबत दोन महत्वाच्या भागीदाऱ्या केल्या. त्याने रहाणेसोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली. चौथ्या विकेटसाठी रिंकूसोबत 30 चेंडूत 60 धावांची पार्टनरशिप केली.

Follow Us