Dombivali BJP News | डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडला.
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडला. पक्षप्रवेशावेळी प्रकाश तेलगोटे यांनी उद्धव ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. मात्र, या वेळी भावनिक वातावरण निर्माण झाले आणि बोलताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या घडामोडींनंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया काय असेल, तसेच उद्धव ठाकरे या निर्णयावर काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

