AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians : अखेर जिंकले, मुंबई इंडियन्सची 14 वर्षांनतर विजयी सलामी, कॅप्टन हार्दिकने प्रतिक्षा संपवली

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत अखेरीस 2012 साली हंगामातील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर मु्ंबईला गेल्या 14 हंगामात आपला पहिला सामना जिंकता आला नव्हता. मात्र अखेर भारताने ही प्रतिक्षा संपवली आहे.

Mumbai Indians : अखेर जिंकले, मुंबई इंडियन्सची 14 वर्षांनतर विजयी सलामी, कॅप्टन हार्दिकने प्रतिक्षा संपवली
Hardik Padnya Mumbai IndiansImage Credit source: IPL X Account
| Updated on: Mar 30, 2026 | 6:35 AM
Share

आयपीएलच्या 19 व्या मोसमातील पहिला सामना 28 मार्चला खेळवण्यात आला. सलामीच्या सामन्यात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शनिवारी गतविजेत्या आरसीबीने सनरायजर्स हैदराबादला पराभूत करुन विजयी सुरुवात केली. विराट कोहली सर्वाधिक धावा करुन आरसीबीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानंतर या हंगामातील दुसऱ्या सामन्यात रविवारी 29 मार्चला स्पर्धेतील सर्वात यशस्वी पहिली टीम मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. विराटप्रमाणे रोहित शर्मा याने रायन रिकेल्टन याच्यासह मॅचविनिंग खेळी करुन मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईने या विजयासह 14 वर्षांची प्रतिक्षा संपवली.

मुंबईचा वानखेडेत दणदणीत विजय

उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे मुंबई इंडियन्सचं होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मुंबईसमोर आपल्याच घरच्या मैदानात आणि पहिल्याच सामन्यात सर्वात मोठं आव्हान होतं. मुंबईने ही संधी गमावली तर पुन्हा 1 वर्ष वाट पाहावी लागणार होती. तसेच मुंबई गेल्या 13 हंगामांपासून सातत्याने अपयशी ठरत होती. त्यामुळे मुंबई 29 मार्चला यशस्वी ठरणार का? याकडे साऱ्या पलटणचं लक्ष लागून होतं. मात्र यंदा मुंबईने चाहत्यांची निराशा केली नाही.

मुंबई 14 वर्षांनंतर यशस्वी

मुंबईसाठी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा विजय अविस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरला. मुंबईने विजयासाठी मिळालेलं 221 धावांचं आव्हान हे 19.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मुंबईने 4 विकेट्स गमावून 224 धावा केल्या आणि विजयी सलामी दिली.

मुंबईचा वनवास संपला

मुंबईने या विजयासह 14 वर्षांची दीर्घ प्रतिक्षा संपवली. मुंबईने 14 वर्षानंतर आयपीएलच्या हंगामातील आपला सलामीचा सामना जिंकला. मुंबईने अखेरीस 2012 साली स्पर्धेत आपला पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर मुंबई 14 वर्षांनंतर आज 29 मार्च 2026 रोजी विजयी सलामी दिली.

मुंबईने असा जिंकला सामना

केकेआरसाठी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे केकेआरला आपल्या पहिल्याच सामन्यात 220 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र प्रत्युत्तरात मुंबईने हे आव्हान 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईने 224 धावा केल्या. रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले. रायनने 81 तर रोहितने 78 धावा केल्या. तर  इतरांनी आपलं योगदान दिलं.

पलटणचा दणदणीत विजय

मुंबईचा दुसरा सामना कधी?

दरम्यान मुंबई या मोसमातील आपला दुसरा सामना हा आता 4 एप्रिलला खेळणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात अक्षर पटेल याच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे.

Follow Us
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.