AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs KKR : रोहित-रायनची तोडु खेळी, मुंबईची विजयी सलामी, केकेआरचा 6 विकेट्सने धुव्वा

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Match Result : मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियममध्ये विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. मुंबईने वानखेडे स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला.

MI vs KKR : रोहित-रायनची तोडु खेळी, मुंबईची विजयी सलामी, केकेआरचा 6 विकेट्सने धुव्वा
Ryan Rickelton and Rohit SharmaImage Credit source: IPL X Account
| Updated on: Mar 30, 2026 | 6:01 AM
Share

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात विजयी सुरुवात केली आहे. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाताने मुंबईसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 5 बॉलआधी पूर्ण केलं. मुंबईने 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 222 धावा केल्या. मुंबईने अशाप्रकारे आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. तर केकेआर अपयशी ठरली. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन ही जोडी मुंबईच्या विजयाची शिल्पकार ठरली. तर इतरांनीही योगदान दिलं.

केकेआरची बॅटिंग

मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला.  कर्णधार हार्दिक पंड्याने याने  केकेआरला बॅटिंगसाठी बोलावलं. केकेआरसाठी लोकल बॉय असलेल्या 2 फलंदाजांनी धमाका केला. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी या दोघांनी अर्धशतक झळकावलं. तर फिन एलन आणि याने निर्णायक योगदान दिलं. तसेच अखेरच्या क्षणी उपकर्णधार रिंकू सिंह याने फिनिशिंग टच दिला. अजिंक्यने 67 आणि फिनने 37 धावांची खेळी केली. कॅमरुन ग्रीन 18 धावा करुन माघारी परतला. अंगकृषने 51 धावा जोडल्या. तर रिंकूने 33 आणि रमनदीप सिंह याने 4 धावा केल्या. केकेआरने अशापक्रारे 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 220 धावा केल्या.  तर मुंबईसाठी लोकल बॉय शार्दूल ठाकुर याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.

रोहित-रायनची कडक ओपनिंग

त्यानंतर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने शतकी भागीदारी करुन मुंबईला अप्रतिम सुरुवात करुन दिली. या जोडीनेच मुंबईचा विजय निश्चित केला. या दोघांनी 11.5 ओव्हरमध्ये 148 रन्सी पार्टनरशीप केली. मुंबईने रोहितच्या रुपात पहिली विकेट गमावली. रोहितने 78 धावा केल्या. रायन रिकेल्टन याने सर्वाधिक 81 धावा जोडल्या. सूर्याने 16 आणि तिलक वर्मा याने 20 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन हार्दिक पंड्या आणि नमन धीर या जोडीने मुंबईला विजयापर्यंत पोहचवलं. नमनने 5 आणि हार्दिकने 18 धावा केल्या.

मुंबईचा सर्वात मोठा विजय

या विजयासह कितीही मोठं आव्हान असोत मुंबई ते पूर्ण करतेच हे पलटणने दाखवून दिलं. मुंबईने यााआधी 219 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तसेच मुंबई 2012 नंतर पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत आपला पहिला सामना जिंकण्यात यशस्वी ठरली.

शार्दूल ठाकुर मॅन ऑफ द मॅच

दरम्यान घरच्याच मैदानात आणखी एक लोकल बॉय चमकला.  शार्दुल ठाकुर याने 3 विकेट्स मिळवल्या. त्यासाठी शार्दुलचा सामनावीर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे शार्दूलने मुंबईकडून पदार्पणातील सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली.

Follow Us
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...